Shah Rukh Khan And Gauri Khan Dance Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुख- गौरीने अलानाच्या लग्नात जोडीने धरला ठेका, लग्नाची नाही तर शाहरुखच्या डान्सची चर्चा

अनन्या पांडेची बहिण अलाना पांडेच्या लग्नात शाहरुख आणि गौरी खानने देखील हजेरी लावली होती. यांच्या डान्सने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला.

Chetan Bodke

Shah Rukh Khan And Gauri Khan Dance Viral Video: अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे सध्या तिच्या लग्नामुळे बरीच चर्चेत आली आहे. नुकतंच अलानाने तिचा परदेशातील बॉयफ्रेंड इव्होर मॅकेसोबत १६ मार्चला लग्नगाठ बांधली. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली होती.

सध्या यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुख आणि गौरी खानने देखील हजेरी लावली होती. यांच्या डान्सने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, बॉलिवूडचा बादशाह आणि त्याची पत्नी गौरी डान्स करीत आहे. अलानाची आई गौरी आणि शाहरुखला डान्स करण्यासाठी आमंत्रित करते. आमंत्रित करताच त्यांनी डान्सवर ठेका धरताच सोशल मीडियावर ट्रेण्ड झाले. यावेळी शाहरुखने काळया रंगाची कोट आणि पँट घातली आहे तर, गौरीने हिरव्या रंगाचा गाऊन घातला.

ही जोडी या ड्रेसमध्ये बरीच सुंदर दिसत असून सोशल मीडियावर त्यांची बरीच चर्चा होते. अलीकडे, सुहाना खानने अलानाच्या संगीत सेरेमनीत बारीक नक्षीकाम केलेली साडी घातली होती. त्यावर तिने मॅचींग स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता.

सुहानाने तिच्या लूकला मिनिमल ॲक्सेसरी, मेकअप आणि फ्री हेअर डू सोबत पूर्ण केले. यावेळी तिने हाय हिल्सच्या सँडल घातल्या होत्या. सुहानाने ही साडी आपल्या आईची अर्थात गौरी खानची घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Vasai-Virar:महानगरपालिकेच्या द्वारावर झेन-जी आंदोलकांना रोखलं; सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT