Ranveer Singh
Ranveer Singh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: 'हर हर महादेव..., जय शिवाजी...' ; रणवीर सिंहनं भाजपच्या मराठी दांडियात दिल्या घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या महाराष्ट्रासह मुंबईत (Mumbai) नवरात्रोत्सवात दांडियाचे आयोजन केले जात आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात शहीद भगतसिंह मैदानामध्ये भाजपकडून (BJP) मराठी दांडियाचे (Shardiy Navratrotsav) खास आयोजन करण्यात आले. या गरब्यात दररोज कलाकार मंडळी आपली उपस्थिती लावत आहेत. तसेच रविवारी सायंकाळी बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंहने (Bollywood Actor Ranveer Singh) याठिकाणी हजेरी लावली होती. कोणत्या ना कोणत्या विषयामुळे सोशल मीडियावर रणवीर चर्चेत असतो. सोबतच फिटनेस फंडा आणि प्रत्येक कामातील उत्साहासाठी त्याच्या चाहत्यावर्गात तो लोकप्रिय आहे.

रणवीरच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये अफाट एनर्जी लावत त्याने खास डान्स केला आहे. त्या डान्सला नेटकऱ्यांसोबत चाहत्यांकडूनही चार चॉंद लावले आहेत. तसेच रॅपरची भूमिका केलेल्या 'गली बॉय' मधील 'अपना टाईम आयेगा' या गाण्यावर लहानग्यांपासून तरुणाईपर्यंत सर्वच थिरकले होते.

या नवरात्रीतील कार्यक्रमात रणवीरने दिलेल्या 'हर हर महादेव, जय शिवाजी' या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी रणवीर सिंहचं स्वागत करत रणवीरच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. दरम्यान काळाचौकीत रणवीर पोहोचल्यापासूनचे काही खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काळाचौकीच्या शहीद भगतसिंह मैदानात यंदा भाजपाने मराठी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला गरबा रसिकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. रणवीरच्या एन्ट्रीवेळी जय श्रीरामचे गाणे लावण्यात आले होते. त्यावेळी रणवीरसोबत तरुणाईही गाण्यावर थिरकली. रणवीरची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. रणवीरच्या फुल ऑन एनर्जीने मैदानात वेगळाच उत्साह निर्माण झाला होता.

यावेळी रणवीरने अपना टाईम आयेगा गाणे गायल्यानंतर आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, 'अपना टाईम आयेगा नाही तर अपना टाईम आ गया.' राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे, आता प्रत्येक हिंदू सण साजरा होणार म्हणजे होणार असल्याचेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food for Thyroid: आहारात 'या' पोषक घटकांचा समावेश केल्यास थायरॉईडची समस्या होईल दूर

Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांनी केला प्रवाशाचा चाकूने भोसकून खून

Navi Mumbai BJP News | नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, कारण काय?

Chitra Wagh Video: Ullu App चं नाव घेत चित्रा वाघ यांचा ठाकरे पिता पुत्रांवर सनसनाटी आरोप!

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' ज्यूसचे करा सेवन, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात

SCROLL FOR NEXT