Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: 'कलाकाराला मर्यादा नसतात…' रणबीरला करायचे आहे 'या' पाकिस्तानी कलाकारासोबत काम

दुबईच्या जेद्दाह येथे सुरु असलेल्या 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये अनेक बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकार उपस्थित झाले आहेत.

Chetan Bodke

Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसाठी हे वर्ष चांगलेच आनंद देणारा ठरला, असे म्हणायला वावगं ठरणार नाही. आयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली होती. तर सोबतच त्याचा शमशेरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा इतका खास चालला नाही. सोबतच त्याने यावर्षात आपल्या चाहत्यांना खूप मोठी गुड न्युज देखील दिली होती. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म देत गोड बातमी दिली होती.

रणबीर जरीही सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी त्याची कायम चर्चा होत असते. दुबईच्या जेद्दाह येथे सुरु असलेल्या 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये अनेक बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकार उपस्थित झाले आहेत. या फेस्टिव्हलला रणबीरनेही हजेरी लावली होती. याची सांगता आज अर्थात १० डिसेंबरला सांगता होणार आहे. यामधील बऱ्याच कलाकारांचे वक्तव्य चर्चेत असतात. आता रणबीर सुद्धा चर्चेत आला आहे.

त्याने यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना सांगितले की, मला पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा आहे. रणबीरने 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या फवाद खानच्या अभिनयासह चित्रपटाचे बरेच तोंड भरुन कौतूक केले.

सोबतच मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. सोबतच रणबीर म्हणतो, "कलाकाराला कोणतीही मर्यादा नसते. 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. मला भविष्यात पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला नक्की आवडेल. "

फवाद खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाने केवळ पाकिस्तानातच नाही तर जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले. भारतातही या चित्रपटाबाबत कुतूहल दिसून येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार लवकरच हा चित्रपट भारतातही या चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे असं बोललं जातंय. रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाशी या चित्रपटाची टक्कर होऊ शकते.

यासोबतच रणबीर कपूर लवकरच रश्मिका मंदानाबरोबर ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच त्याच्याकडे लव रंजन यांचा एक चित्रपट आहे, ज्यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

SCROLL FOR NEXT