Rahul Bose Birthday News Instagram
मनोरंजन बातम्या

Rahul Bose Birthday: अभिनयासह ‘या’ क्षेत्रातही माहीर ठरलेला राहुल बोस अभिनेता कसा झाला?

Rahul Bose Birthday News: अभिनयासह, विविध खेळात आणि समाजसेवेत अग्रेसर असलेल्या राहुलचा आज २७ जुलै १९६७ रोजी जन्म झाला.

Chetan Bodke

Rahul Bose Career: अभिनेता राहुल रॉय बॉलिवूडमध्ये नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाची नेहमीच चर्चेत आहे. राहुल रॉय अनेकदा त्याच्या सामाजिक कार्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत राहतो. समाजसेवेत अग्रेसर राहिलेला राहुल अनेक वेगवेगळ्या खेळात अग्रेसर आहे. अशा हरहुन्नरी अभिनेत्याचा आज वाढदिवस. अभिनेत्याचा जन्म २७ जुलै १९६७ मध्ये झाला असून आज तो, आपला ५६ वा वाढदिवस साजरा करणार आहे.

आपल्या करियरमध्ये बहुआयामी ठरलेल्या राहुलला वयाच्या ६ व्या वर्षापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. त्याने शाळेत असल्यापासूनच शाळेतील नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. ‘द परफेक्ट मर्डर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. सोबतच त्याने ‘बॉम्बे बॉईज’ मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या सोबत स्क्रिन शेअर केली होती. राहुलने त्याच्या सिनेकरकिर्दित अनेक बंगाली, हिंदी आणि तमिळ चित्रपटात काम केलेय. राहुल रॉयला ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटामुळे अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली.

अभिनयात डेब्यू करण्यापूर्वी राहुलने खेळामध्ये सक्रिय होता. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणारा तो भारतीय रग्बी संघाचा खेळाडू होता. राहुलने रग्बी शिवाय क्रिकेट आणि बॉक्सिंगमध्ये देखील आपले नशीब आजमावले. राहुलने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. सोबतच, बॉक्सिंग स्पर्धेतही राहुलने रौप्य पदक देखील मिळवले होते. पण नेहमीच खेळात माहीर असलेल्या राहुलचे मन कालांतराने त्याचे मन चित्रपटांकडे वळू लागले. (Entertainment News)

राहुल बोसने ‘द परफेक्ट मर्डर’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘मान गए मुगल-ए-आझम’, ‘झंकार बीट्स', ‘कुछ लव जैसा’, ‘चमेली’, ‘शौर्य’, ‘चेनकुली की मेनकुली’ आणि ‘दिल धडकने दो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला. राहुलने बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. राहुल नेहमीच अभिनय, क्रीडा आणि सामाजिक कार्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतो. (Bollywood Actor)

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने नुकतच ‘नियत’ चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारली होती. सोबतच झी ५ वर प्रदर्शित झालेल्या ‘ताज’ वेब सीरिजमध्ये देखील त्याने मुख्य भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT