Manoj Bajpayee Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee: मनोज वाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Manoj Bajpayee: अभिनेते मनोज वाजपेयी यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ४.४५ एकर जमीन खरेदी केली आहे. या व्यवहारासाठी त्यांनी १.३७ कोटी रुपये मोजल्याची माहिती समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Manoj Bajpayee: मुंबईतील वाढती लोकसंख्या, गजबजाट आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक सेलिब्रिटी शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी गुंतवणूक करण्याला पसंती देतात. आता या यादीत अभिनेता मनोज वाजपेयी यांचाही समावेश झाला आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे मनोज वाजपेयी यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात जमीन खरेदी केली आहे. मुंबईच्या गजबजाटापासून दूर असलेल्या ग्रामीण आणि निसर्गरम्य परिसरात त्यांनी तब्बल १.८० हेक्टर म्हणजेच जवळपास ४.४५ एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

१.३७ कोटी रुपयांना खरेदी केली जमीन

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांमधून मनोज वाजपेयी यांच्या या गुंतवणुकीची माहिती समोर आली आहे. CRE Matrix कडून मिळालेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी १.८० हेक्टर जमीन १.३७ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करण्याचा व्यवहार २५ ऑगस्ट रोजी झाला. या व्यवहारासाठी मनोज वाजपेयी यांनी ६.८७ लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली. त्यानुसार, जमिनीची व्यवहारातील किंमत प्रति एकर सुमारे ३०.९ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. मनोज वाजपेयी यांनी ही जमीन विमलचंद खिमराज जैन यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती मालमत्ता नोंदणी कागदपत्रांमध्ये नमूद आहे.

मुंबई आणि पुण्यापासून किती दूर आहे?

मनोज वाजपेयी यांनी जमीन खरेदी केलेलं मुळशी तालुक्यातील तैल बैला हे गाव मुंबई आणि पुण्यापासून तुलनेने दूर, निसर्गरम्य परिसरात आहे. हे गाव मुंबईपासून सुमारे ११९ किलोमीटर, तर पुण्यापासून सुमारे १०१ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण लोणावळ्याजवळ वसलेलं आहे.

तैल बैला कशासाठी प्रसिद्ध?

तैल बैला हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र गडकिल्ले या ट्रॅव्हल ग्रुपच्या माहितीनुसार, येथे तब्बल २०० ते २५० फूट उंचीच्या दोन भव्य खडकांच्या भिंती आहेत. रॉक क्लायंबिंग आणि रॅपलिंगसाठी हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. याच परिसरात सुमारे ३,३२२ फूट उंचीवर तैल बैला किल्ला आहे. त्यामुळे निसर्ग, शांतता आणि साहसी पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी हा परिसर पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. मनोज वाजपेयी यांनी अशा निसर्गरम्य ठिकाणी जमीन खरेदी केल्याने त्यांच्या या नव्या गुंतवणुकीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विरोधक एकवटले, सत्ताधाऱ्यांना भिडले, आंदोलनांचा धडाका, विरोधकांना संजीवनी

Castor Oil: महिलांनी नाभीत २ थेंब एरंडेल तेल सोडावे, १५ दिवसांत दिसेल चमत्कार

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का

Weak Eyesight : डोळ्यांच्या या त्रासांकडे दुर्लक्ष करताय? असू शकतो नजर कमजोर झाल्याचा इशारा

Wall Clock Direction: घरामध्ये घड्याळ कोणत्या भितींवर लावावे? योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT