Bhool Bhulaiyaa 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhool Bhulaiyaa 3 News: ‘भूल भुलैया ३’बद्दल कार्तिक आर्यनने दिली महत्वाची अपडेट, पोस्ट करत म्हणाला...

Kartik Aaryan News: कार्तिकने नुकतीच चाहत्यांसोबत चित्रपटासंबंधित एक मोठी अपडेट दिली आहे.

Chetan Bodke

Bhool Bhulaiyaa 3 Latest Update

बॉलिवूड सेलिब्रिटी कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया २’ला मिळालेल्या घवघवीत यशामुळे प्रचंड चर्चेत आला होता. ‘भूल भुलैया’च्या फ्रेंचायझीला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. ‘भूल भुलैया’ आणि ‘भूल भुलैया २’ नंतर आता लवकरच ‘भूल भुलैया ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘भूल भुलैया ३’ची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, कार्तिकने चाहत्यांसोबत चित्रपटासंबंधित एक मोठे अपडेट चाहत्यांना दिली आहे.

कार्तिक कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. कार्तिक आर्यन नेहमीच चाहत्यांसोबत खासगी आयुष्यासोबत आपल्या चित्रपटांबद्दल माहिती शेअर करत असतो. अशातच अभिनेत्याने, ‘भूल भुलैया ३’बद्दल अपडेट शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये कार्तिक पाठ मोहरा उभा दिसतोय. देवाकडे हात जोडून उभा राहिलेला तो दिसत आहे. "माझ्या करियरमधील सर्वात मोठा चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करत आहे." असं कॅप्शन देत अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याच्या ह्या पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिसाद मिळत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘ऑल द बेस्ट’, ‘अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा’, ‘चित्रपटासाठी खूप खूप गुडलक’, ‘नक्कीच चित्रपट ब्लॉकबस्टर होणार’, ‘चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसायला हवे...’ अशे कमेंट्स चाहत्यांनी केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या शुटिंगच्या तारखेबद्दल सांगितले होते.

चित्रपटाची शुटिंग उद्यापासून अर्थात १० मार्चपासून सुरूवात होणार आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबतच तृप्ती डिमरी व विद्या बालन दिसणार आहे. मागील चित्रपटाप्रमाणेच यावेळीही अनीस बज्मीच चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटात माधुरी दीक्षितही दिसण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT