Kartik Aaryan With His Mom Mala Tiwari Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan Emotional Post: हसऱ्या चेहऱ्यामागचे दुःख..! कॅन्सरच्या काळात आईच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा कार्तिक झाला भावुक

Kartik Aaryan's Mom Beat Cancer: कार्तिक आर्यनने आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केले आहे.

Pooja Dange

Kartik Aaryan Share Emotional Post For His Mother: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची आई माला तिवारी कॅन्सरपासून मुक्त झाल्या आहेत. कार्तिक आर्यनने आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केले आहे. तिने कॅन्सरसारख्या आजारावर मात केली आहे आणि आयुष्याच्या एका सुंदर प्रवासात पुढे जात आहे. अभिनेता आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा जीवनातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे. हाच आनंद कार्तिकने त्याच्या पोस्टमध्ये शेअर केला आहे.

कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये त्याच्या आईच्या धैर्याचे कौतुक केले आहे. तसेच पोस्टमध्ये आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितले आहे. (Latest Entertainment News)

या क्षणांनी त्याच्या कुटुंबाला प्रेम करायला आणि सपोर्ट द्यायला शिकवला. कार्तिक आर्यनने लिहिले आहे की, 'काही काळापूर्वी याच महिन्यात कॅन्सरसारखा आजार आमच्या घरात आला आणि आमच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.'

त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, 'आम्ही हताश आणि निराश त्याचबरोबर असहाय देखील झालो होतो. पण माझ्या आईची इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याचा स्वभाव यामुळे आम्ही मोठ्या धैर्याने पुढे गेलो आणि अंधारावर विजय मिळवला.

कारण आम्हाला ही लढाई जिंकायची होती. यासगळ्याने आम्हाला हे शिकवलं आणि आम्ही दररोज जे शिकत आहोत ते म्हणजे तुमच्या कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंब्यामुले सगळं शक्य होत. त्यापेक्षा मोठं काहीही नाही. #SuperHero #CancerWarrior'

याआधीही कार्तिक आर्यनने त्याच्या आईसोबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्या व्हिडिओमध्ये कार्तिक आपल्या आईच्या कॅन्सरबद्दल बोलला होता. कार्तिकची आई ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. व्हिडिओमध्ये आपल्या आईबद्दल बोलताना कार्तिक खूप भावूक झाला होता. त्याच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. तसेच त्याच्या आईसाठी सदिच्छा मागत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT