Zwigato In Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma: 'या' सिनेमात चक्क शाहरुखच्या जागी झाली कपिल शर्माची निवड, दिग्दर्शकाचा खास खुलासा

काल (बुधवार) 'झ्विगाटो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून कपिलने चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिता दाससोबत आपला अनुभव शेअर केला.

Chetan Bodke

Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याचा 'झ्विगाटो' (Zwigato) हा चित्रपट 17 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे कौतुक झाले आहे.

काल (बुधवार) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून कपिलने चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिता दाससोबत आपला अनुभव शेअर केला. कपिलने नंदिताने त्याची का निवड केली याचे कारण स्पष्ट केले, जेव्हा त्याने स्वतः दिग्दर्शकाला हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्या उत्तराने तो आश्चर्यचकित झाला होता.

ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात कपिल म्हणतो, "मी नेहमीच नंदिता यांच्या कामाचा चाहता आहे, त्यामुळे जेव्हा त्यांनी चित्रपटासाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी 50 टक्के तयार होतो. कारण जेव्हा तुम्हाला एखाद्याचे काम आवडते, तेव्हा तुमचा त्यांच्यावर आपोआपच खूप विश्वास निर्माण होतो. नंदिता माझ्यासोबत बोलत असल्याने मला माहित होते माझे काम नक्की होणार. नक्कीच दिग्दर्शिकेने माझा फार विचार केला असावा. म्हणून जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा त्यांनी मला चित्रपटाची कथा सांगितली. तेव्हा मला माहित होते की ही एक सुवर्ण संधी होती. कारण मला कोणीही गांभीर्याने घेत नाही."

कपिल सहज विनोद करत बोलतो, "माझी पत्नीसुद्धा मला गांभिऱ्याने घेत नाही. लग्नानंतर दोन वर्षांनी माझी बायको माझा गांभिऱ्याने विचार करते. जोपर्यंत आपण काहीतरी वेगळं करत नाही, तोपर्यंत लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत. पण हे घडले ते नंदिता आणि समीर सरांमुळे."

पुढे कपिल म्हणतो, "नंदिता मला चित्रपटाची स्टोरी सांगत होती त्यावेळी मी विचारलं, तू नक्की मला या चित्रपटाची ऑफर देत आहेत? तर तिने इतकं छान उत्तर दिलं की मी क्षणभर विचारात होतो. मला वाटले ते कौतुक होते की अपमान? नंदिता म्हणाली, शाहरुख खानसारख्या ग्लोबल स्टारने या चित्रपटासाठी हो म्हटले तरी मी नकार देईन. म्हणून मी पुन्हा विचारले की, फक्त मीच का?"

यावर नंदिता म्हणते, कारण तुझा चेहरा सामान्य माणसासारखा साजेसा आहे. कपिल तू स्टार नसून सामान्य माणसासारखा दिसतोस म्हणून मी तुझी निवड केली. म्हणूनच माझ्या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी योग्य समजून निवड केली. पुढे कपिल म्हणतो, 'झ्विगाटो'मधील डिलेव्हरी बॉयचे पात्र मी फारच जवळून स्विकारले आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला फारसे आव्हान वाटले नाही. या चित्रपटात कपिल शर्मासोबत शहाना गोस्वामीही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

SCROLL FOR NEXT