hrithik roshan  saam tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: हृतिक निघाला गर्लफ्रेंडसोबत; कॅमेऱ्यात कैद होऊनही म्हणतो…

हृतिक चित्रपटाच्या शूटिंगवरुन परतल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिसला असून त्याची सर्वत्र कमालीची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Hrithik Roshan: बॉलिवूडचा हॅंडसम अभिनेता हृतिक रोशन त्याच्या विशेष लूकमुळे चर्चेत आहे. खासकरुन त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट म्हणजे क्रिश. या चित्रपटामुळे तो बराच प्रकाश झोतात आला. नुकताच हृतिक त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटाचे शुटिंग आवरुन तो मुंबईत परतला आहे. चित्रपटात हृतिकसोबत दीपिका पदुकोण आणि अनिल कपूरही दिसणार आहेत. शुटिंग संपल्यानंतर तो एका खास व्यक्तीसोबत कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हृतिक रोशनचे वय ४८ असून त्याची फिटनेस तरुणांना लाजवेल अशी आहे. हृतिक चित्रपटाच्या शूटिंगवरुन परतल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिसला. लंच डेटसाठी बाहेर पडल्यावर मीडियाने लव्हबर्ड्सला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी दोघांनीही एकमेकांचा हात हातात पकडला होता. हृतिकला या स्टाईलमध्ये पाहून चाहत्यांना पूर्वीच्या लूकची आठवण झाली होती.

व्हायरल व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद आपल्या रोमान्समध्ये दंग झाले आहेत. दोघे हातात हात घालून एकत्र फिरताना दिसले. दोघांनी डेटसाठी कॅज्युअल आउटफिट घातले होते. हृतिकने पांढऱ्या पँटसह स्वेटशर्ट घातला होता, तर सबाने जॉगर्ससह निळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. दोघांचीही जोडी शोभून दिसत होती.

ते दोघेही आपल्या नात्याला वेगळे वळण देणार असल्याचे काही दिवसांपूर्वी चर्चा होत होती. पण ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार “हृतिक आणि सबा एकत्र येण्याचा विचार करत नाहीत. सध्या दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. सबा 'रॉकेट बॉईज 2' आणि 'फ्रंट पेज'या चित्रपटातून दिसणार आहे तर, हृतिक आसाममध्ये 'फायटर' साठी शूटिंग करत आहे.

हृतिकने त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर अफवा पसरवली जात आहे, यावर आपले मत मांडले आहे, 'यात काहीही तथ्य नाही. माझ्याबद्दल नेहमीच चाहत्यांमध्ये कुतूहल असते, म्हणून चाहते नेहमी माझ्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कदाचित आपण सर्व या चुकीच्या माहितीपासून दूर राहणे चांगले आहे. सर्व पत्रकार बंधू आपल्याला वेळोवेळी खरोखर माहिती देतील.

'फायटर'मध्ये दीपिका पदुकोणसोबत हृतिक रोशन दिसणार असून जानेवारी 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT