Govinda-Krushna SAAM TV
मनोरंजन बातम्या

Govinda-Krushna: ७ वर्षांचा वनवास अखेर संपला; मामा-भाच्याची झाली भेट,भावुक होऊन कृष्णा म्हणाला...

Krushna Abhishek : सात वर्षांनी गोविंदाला भेटल्यामुळे कृष्णा भावुक झाला. मामाच्या भेटीनंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घ्या तो नेमकं काय बोला.

Shreya Maskar

बॉलिवूडचा गोविंदा आणि प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक गेली ७ वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र अलिकडेच गोविंदाला चुकून बंदुकीची गोळी लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी गोविंदाच्या तब्येतीची चौकशी करायला रुग्णालयात धाव घेतली. मात्र त्यावेळी गोविंदाचा (Govinda ) भाचा कृष्णा कुठेच पाहायला मिळाला नाही. कारण कृष्णा अभिषेक आपल्या कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेला होता. मात्र गोविंदाची बातमी ऐकताच कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishek ) बायको कश्मीरा शाह गोविंदाला भेटायला रुग्णालयात गेली होती.

आता कृष्णा अभिषेक देखील गोविंदाला भेटल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, "मामाची तब्येत आता ठीक आहे. मी ऑस्ट्रेलियाला असताना मामाला अपघात झाल्याची बातमी कळाली. हे ऐकताच माझे दौरे रद्द केले होते मात्र कश्मीराकडून मामा ठीक असल्याची बातमी कळताच मी शांत झालो. "

कृष्णा अभिषेक पुढे म्हणाला की, मी ७ वर्षांनी पहिल्यांदा मामाला भेटलो आहे. मला अर्धा वनवास पूर्ण केल्यासारखे वाटत आहे. मी मामासोबत एक तास घालवला. तब्बल सात वर्षांनी नम्मोला म्हणजे गोविंदाची मुलगी टीना आहूजा देखील भेटलो. आम्ही खूप भावनिक झालो. मी तिला मिठी देखील मारली. एकत्र बसून जुने दिवस आठवले. मामाला म्हटलं की, हॉल पूर्णपणे बदलाय. आता आमच्यातले प्रश्न सुटले आणि तक्रारी, मतभेद दूर झाले आहेत. शेवटी कृष्णा बोला की, मामी कामात असल्यामुळे मला भेटू शकली नाही. पण खरंच मला तिच्या समोर जायला थोडी भीती वाटते. आता मी मामाच्या घरी जात राहणार.

गेल्या सात वर्षांपासून गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात वाद होते. आपसातील कौटुंबिक मतभेदांमुळे यांच्यात भांडणे झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाने कृष्णाच्या विनोदबुद्धीवर कमेंट केली होती. तसेच कश्मीराने देखील अपमान केल्याचे बोले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT