Salman Khan And Mother Salma Dance Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Salman Khan And Mother Salma Dance: भाईजानचा आई सलमासोबत भन्नाट डान्स; मायलेकांचा प्रेम पाहूनच चाहतेही थक्क

Salman Khan And Mother Salma Dance Video: बॉलिवूडचा दबंग अभिनेता आणि आई सलमाचा सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Salman Khan And Mother Salma Dance Viral Video

नुकतंच सलमान खानने आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याची सोशल मीडियावर नेहमीच क्रेझ पाहायला मिळते. नुकतंच अभिनेता सलमान खान आणि त्याची आई सलमाचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दोघांनीही ह्या व्हिडीओमध्ये खूप सुंदर डान्स केलेला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये त्याचे आणि त्याच्या आईसोबतचे नाते कसे आहे? हे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Bollywood)

खरंतर, सलमान खान त्याच्या पर्सनल लाईफमध्ये जितका रागीट आहे. तितकाच तो मोस्ट केअरिंग पर्सन सुद्धा आहे. त्याच्या स्वभावाचा पुन्हा एकदा नेटकऱ्यांना प्रत्यय आला आहे. सलमान खानने आपल्या आईसोबतचा एक व्हिडीओ त्याच्या पर्सनल इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘आई बोलतेय, बंद कर हे नाच गाणं’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. आई सलमा आणि भाईजानने 'चीप थ्रिल्स' वर डान्स केलेला दिसत आहे. (Viral Video)

व्हिडीओबद्दल सांगायचे तर, आई सलमा आणि भाईजान दोघेही हळूहळू डान्स करत आहे. डान्स करता करता सलमानला त्याच्या आईने मिठी मारली आहे. नंतर सलमा तो व्हिडीओ शूट करणाऱ्याला व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद कर असं बोलतेय. सलमान खानने ब्लॅक कलरचा टी-शर्ट आणि ब्ल्यू डेनिम जीन्स वेअर केलेली दिसते. तर आई सलमा यांनी फुलांची डिझाईन असलेला फुल्ल प्रिंटेड कुर्ता परिधान केलेला दिसतोय. सलमान खान आणि त्याच्या आईचा हा क्यूट डान्स पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Bollywood Actor)

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेता सलमान खान नुकताच ‘टायगर ३’ मध्ये दिसला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान लवकरच करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. मात्र, त्या चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Signs Astro Tips: 'या' राशींच्या व्यक्ती असतात फार तापट स्वभावाच्या; पाहा तुमची रास यात आहे का?

Maharashtra Rain Live News: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT