Ayushmann Khurrana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ayushmann Khurrana Video: आयुष्मान खुरानाला 'Moye Moye'ची भूरळ, लाइव्ह कॉन्सर्टमध्येच गायलं गाणं

Ayushmann Khurrana Live Concert: बॉलिवूडचा सुपरस्टार आणि सिंगर आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आयुष्मान देखील 'मोये मोये' ट्रेंडमध्ये सहभागी झाला आहे.

Priya More

Ayushmann Khurrana:

सध्या सोशल मीडियावर (Social Media) नव-नवीन ट्रेंड व्हायरल होत असून नेटिझन्स देखील या ट्रेंडला फॉलो करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी 'जस्ट लुकिंग लाइक ए वॉव' हा ट्रेंड सुरू होता.

आता एक नवा ट्रेंड आला असून सध्या नेटिझन्सला या ट्रेंडची भूरळ लागली आहे. या ट्रेंडचे नाव आहे 'मोये मोये' (Moye Moye) मोमेंट. सध्या बॉलिवूडचा सुपरस्टार आणि सिंगर आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आयुष्मान देखील 'मोये मोये' ट्रेंडमध्ये सहभागी झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मोये मोये' ट्रेंडला सध्या हजोरा लोकं फॉलो करताना दिसत आहे. सोशल मीडियावर रिल्स तयार करून ते शेअर करत आहेत. आयुष्मान खुरानाचेही नाव आता 'मोये मोये' ट्रेंड रीलमध्ये सामील झाले आहे. सोशल मीडियावर आयुष्मान खुरानाच्या फॅन पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आयुष्मान हजारो लोकांमध्ये स्टेजवर उभा राहून 'मोये मोये' गाणं गाताना दिसत आहे. अभिनेता गमतीने म्हणतो, 'मी इथे ट्रेंड तयार करण्यासाठी नाही तर गाणं गाण्यासाठी आलो आहे.'

नुकताच आयुष्मान खुरानाची म्यूजिक कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टमध्ये गाणं गाताना अचानक आयुष्मान खुराना 'मोये मोये' गाताना दिसतो. या कॉन्सर्टला आलेले प्रेक्षक देखील जोरजोरात ओरडू लागतात आणि आयुष्मानला प्रोत्साहन देतात. अशामध्ये गाणं गाताना तो थांबतो चाहत्यांना मस्करीमध्ये म्हणतो, 'मी ट्रेंड बनवण्यासठी आलो नाही, गाणं गाण्यासाठी आलो आहे.'

'मोये मोये' हे एक सर्बियन गाणं आहे. या गाण्याला सिंगर टेया डोरा यांनी गायलं आहे. या गाण्याचा अर्थ होतो की खराब स्वप्न. हे गाणं याचवर्षी रिलीज झाले. खरं तर हे गाणं 'मोये मोर' असं आहे. सध्या या गाण्याला खूप चांगली पसंती मिळत असून आता हे गाणं टेंडिंगमध्ये देखील आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याचा ट्रेंड आला असून अनेक जण तो फॉलो करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT