Arjun Kapoor Help 11-year-old girl Cricketer Saam TV
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor's sponsorship: ११ वर्षीय अनिशासाठी आधार बनला अर्जुन कपूर; चिमुकलीचे स्वप्न साकारण्यासाठी करणार मदत

Arjun Kapoor help for girl cricketer: अनिशाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने मदतीचा हात पुढे केला आहे.

Pooja Dange

Arjun Kapoor's sponsorship of girl cricketer: 'अंग्रेज चाले गये ओर क्रिकेट छोड गये' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या देशभरात 'आयपीएल'ची धूम आहे. सर्वत्र आपल्याला आयपीएलसाठी लोकांमध्ये असलेली उत्सुकता पाहायला मिळत आहे. अगदी खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत सगळ्यांनाच आयपीएलची भुरळ पडली आहे.

क्रिकेट हा खेळ जरी ब्रिटिशांनी भारतात आणला असला तरी भारतीयांचे यावर अपार प्रेम आहे. भारताच्या राष्ट्रीय खेळापेक्षा भारत क्रिकेट खेळाला जातो. देशाच्या खाल्ली-बोळात आपल्याला सचिन,सेहवाग, धोनी पाहायला मिळतात. त्यांनाही मोठे स्टार क्रिकेटर व्हायचे आहे.

अनिशा राऊत या ११ वर्षांच्या मुलीनेही हे स्वप्न पाहिले आहे. अनिशाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने मदतीचा हात पुढे केला आहे. नवी मुंबईच्या पनवेल परिसरात राहणाऱ्या अनिशा राऊतचे स्वप्न आहे की, देशासाठी क्रिकेट खेळून प्रसिद्ध व्हायचे आहे, पण आर्थिक अडचणींमुळे ते शक्य होत नाही. जेव्हा अर्जुन कपूरला अनिशाच्या संघर्षाबद्दल कळले तेव्हा त्याने तिला मदत करण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर अनिशाच्या 18 वर्षांच्या ट्रेनिंग आणि उपकरणाचा खर्च उचलणार आहे. अनिशा सचिन तेंडुलकरला तिचा आदर्श मानते. ती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळली आहे. आता अनिशा फक्त 11 वर्षांची आहे. अनिशा 8 तासांच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी दररोज 80 किलोमीटरचा प्रवास करते.

अर्जुन कपूरच्या मदतीबद्दल अनिशा राऊतचे वडील प्रभात यांनी त्याचे आभार मानले आहेत. अनिशाचे वडील म्हणतात की, 'वर्ल्ड क्लास क्रिकेटर होण्यासाठी महागडे प्रशिक्षण आवश्यक आहे. अनिशाला इंडिया कॅप मिळवायची आहे. अनिशाच्या वडिलांनी, अर्जुन कपूरची मदत अनिशासाठी वरदान असल्याचे सांगितले आहे. या मदतीने त्याच्या खांद्याचे वजन थोडे कमी होईल, असे ते सांगतात.

अर्जुन कपूर नुकताच 'कुट्टे' चित्रपटात दिसला होता. अर्जुन लवकरच 'द लेडी किलर' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो 'मेरे पति की बीवी'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजन असणार आहे. यात अर्जुनसोबत भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT