Anupam Kher SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pahalgam Terror Attack: "चुकीचे, चुकीचे, चुकीचे..."; दहशतवादी हल्ल्यानंतर अनुपम खेर संतापले, रडत रडत केलं सरकारला आवाहन

Anupam Kher : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर संतापले आहेत. त्यांनी दुःख व्यक्त करणारा आणि सरकारला विनंती करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झाले आहे. काश्मीर खोऱ्यातील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. अशात आता सेलिब्रिटींनी आपला संताप व्यक्त केला आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनुपम खेर यांनी झालेल्या घटनेवर दुःख व्यक्त करत रडत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ते व्हिडिओमध्ये बोलत आहेत की, "आज पहलगाममध्ये हल्ला झाला. या हल्ल्यात 28 पर्यटक मारले गेले. मनात खूप दुःख आहे. पण रागाला मर्यादा नाही. मी आयुष्यात काश्मीरमधील लोकांसोबत हे घडताना पाहिले आहे. 'कश्मीर फाईल्स' चित्रपट हा त्याच प्रकारावर प्रकाश टाकणारी छोटी झलक होती."

अनुपम खेर पुढे म्हणाले, "देशाच्या विविध भागातून लोक सुट्ट्या घालवण्यासाठी काश्मीरमध्ये आले होते. त्यांच्या मुलांसह ,कुटुंबासह त्यांची निवड करण्यात आली. त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. काहीवेळा शब्द आपल्याला काय वाटते ते व्यक्त करण्यात अपयशी ठरतात. पतीच्या मृतदेहासोबत असलेल्या महिलेला मी विसरू शकत नाही. मी पल्लवीजींची मुलाखत ऐकत होतो, त्या सांगत होत्या की माझ्या पतीला मारले गेले, म्हणून मी म्हणाले मलाही मार, माझा मुलगा म्हणाला मलाही मार, पण त्यांनी तसे केले नाही. कदाचित त्यांना संदेश द्यायचा होता."

शेवटी अनुपम खेर म्हणाले, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह आणि पूर्ण सरकार हात जोडून विनंती करतो. या वेळी दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला हवा की पुढच्या सात जन्मात असे कृत्य करण्याचे त्यांचे धाडस होणार नाही. दुनियाच्या कोणत्याही भागात असा प्रकार घडणे चुकीचे आहे."

अनुपम खेर यांनी या व्हिडीओला "चुकीचे... चुकीचे... चुकीचे!!! पहलगाम हत्याकांड !! शब्द आज नपुंसक आहेत !!" असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

SCROLL FOR NEXT