Amitabh Bachchan Big Statement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Big Statement: ‘लोकं मस्करी करण्याआधी माझ्या वयाचा....’ ट्रोल होणाऱ्या बिग बींनी केलं मोठं विधान

Amitabh Bachchan Age: वयाच्या ८३ व्या वर्षी देखील बिग बी आपल्या डॅशिंग लूकमुळे चर्चेत राहतात. नुकतंच अमिताभ यांनी आपल्या वयाबद्दल भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Amitabh Bachchan News: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या दमदार भूमिकेमुळे चर्चेत असतात. आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणारे अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी बाईक राईड केली होती. त्यांची बाईक राईडिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यांचा अनेकदा रॉकिंग लूक पाहिल्यावर आपल्याला त्यांचं वय नेमकं काय आहे? असा प्रश्न पडतो. वयाच्या ८३ व्या वर्षी देखील बिग बी आपल्या डॅशिंग लूकमुळे चर्चेत राहतात. नुकतंच अमिताभ यांनी आपल्या वयाबद्दल भाष्य केलं आहे.

सध्या बिग बी ‘प्रोजेक्ट के’ मुळे कमालीचे चर्चेत आहे. या चित्रपटात बिग बी कोणती भूमिका साकारणार याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. सोबतच त्यांच्या वयाचा विचार करता, सध्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारताना ते आपल्याला दिसत आहे. अलीकडेच बिग बींनी स्वतःची खिल्ली उडवल्याची चर्चा आहे. तिथे त्यांनी आपले वयही सांगितले आहे. नेहमीच ब्लॉगच्या माध्यमातून सक्रिय राहणारे बिग बी यावेळी देखील ब्लॉगमुळे चर्चेत राहिले आहेत. नुकतंच बिग बी ब्लॉगमुळे चर्चेत आले आहेत.

बिग बी आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात, “वय झाल्याने आता लोकांनी माझी खिल्ली उडवणं सोडलं आहे. आता मला लोक म्हणतात, ८१ वर्षांचा म्हातारा झाला आहे. म्हातारा कमजोर झाला आहे. त्याला सहन करू शकतो आणि हे सगळे किती दिवस चालणार आहे. हे सगळं किती दिवस चालणार आणि कमेंट्स सुद्धा तशाच येत असतात... बिचारा, तो वेडा माणूस आहे, त्याला आता जाऊद्या... महत्त्वाचं आहे.” या विधानामुळे अमिताभ बच्चन कमालीचे चर्चेत आले आहेत.

बिग बी यांचे हे विधान सध्या तुफान चर्चेत आहे. मुख्य बाब म्हणजे, बिग बींचे वय झाल्याने ट्रोलर्सने आता त्यांची खिल्ली उडवणं बंद केले असल्याचे विधान त्यांनी केले आहे. सध्या बिग बी हे त्यांच्या आगामी ‘सेक्शन 84’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत.

बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, बिग बींचा काही दिवसांपूर्वी ‘उंचाई’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चार मित्रांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केली आहे. सध्या बिग बींकडे दीपिका पदुकोणसोबतचा ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेकही सध्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT