Aamir Khan Talk About Laal Singh Chaddha Failure Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Interview: ‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप कसा ठरला?, बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने सांगितलं कारण

Aamir Khan On Laal Singh Chaddha Failure: एका मुलाखतीमध्ये आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Aamir Khan Talk About Laal Singh Chaddha Failure

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट ‘लाल सिंह चड्ढा’ अखेरचा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर तो एकाही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद न मिळाल्यामुळे अभिनेता खूपच निराश झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. (Bollywood)

चित्रपटाला उत्तम प्रतिसाद न मिळाल्यामुळे अभिनेत्याने सिनेसृष्टीपासून दुर राहण्याचा निर्णय घेतला होता. अखेर मोठ्या ब्रेकनंतर आमिर खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. (Bollywood Actor)

'लाल सिंह चड्ढा'बद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, “हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. करीना आणि माझ्या संपूर्ण टीमने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. खूप मोठ्या काळानंतर माझा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझे कुटुंबीय आणि माझे मित्र मी ठीक आहे का ? आणि माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी यायचे. पण, 'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर मला सर्वांकडूनच खूप प्रेम मिळत होते.” (Bollywood Film)

अभिनेता पुढे म्हणाला, “आपण चूक काय करतो, हे अपयश आपल्याला शिकवते. आपल्याला अपयशातून चूक सुधारण्याची संधी मिळते. चित्रपटाचे फ्लॉप होणे, माझ्यासाठी खूप मोठी शिकवण होती. मला आठवते मी एकदा किरणला म्हणाले होतो, 'या चित्रपटात माझ्याकडून खूप ठिकाणी चूका झालेल्या आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे, मी पहिल्यांदाच एका चित्रपटामध्ये इतक्या चुका केलेल्या आहेत. पण असं असलं तरीही, चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचे मला खूप दु: ख वाटत आहे. परंतू हळूहळू मी या गोष्टींचा स्वीकार केला.” (Bollywood News)

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'लाल सिंह चड्ढा'बद्दल बोलायचे तर, १९९४ मध्ये रिलीज झालेल्या 'फॉरेस्ट गंप'चा हा चित्रपट अधिकृत रिमेक आहे. आमिर खानच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले असून चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आमिर खानशिवाय करीना कपूर आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत दिसले होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आशिष शेलार यांच्या वोट जिहाद च्या मुद्द्याला मनसेकडून जोरदार उत्तर

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

Chanakya Niti: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

Forest Department Recruitment: खुशखबर! वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Moto G67 Power 5G Launched: अडीच बॅटरी बॅकअप, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५० मेगापिक्सेल कॅमेरा; दमदार फीचरवाला Moto चा G67 Power 5G लाँच

SCROLL FOR NEXT