Ajay Devgn Stopped Kajol From Working With Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ajay Devgn To Kajol: ‘तू काम कर पण किंग खानसोबत नको’; असं काजोलला अजय का म्हणाला

Shah Rukh Khan and Kajol's Bond: लग्नानंतर अजयने काजोलला किंग खानसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी नकार दिला होता.

Chetan Bodke

Ajay Devgn Stopped Kajol From Working With Shah Rukh Khan: बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपल पैकी एक असलेल्या काजोल आणि अजय यांची नेहमीच चर्चा होते. या क्यूट कपलची अनेकदा बॉलिवूडमध्ये चर्चा होत असते. रुपेरी पडद्यावर आणि पडद्याआड देखील या जोडीची लव्ह केमिस्ट्री कमालीची चर्चेत असते. या रोमँटिक जोडीच्या लग्नाला आता जवळपास २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर अजयने काजोलला एका अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी नकार दिला होता. नेमका हा सेलिब्रिटी कोण ? आणि अजयने काजोलला का त्यासोबत काम करण्यासाठी नकार दिला. चला तर जाणून घेऊया...

काजोल आणि अजयने १९९९ साली लग्न गाठ बांधली होती. या दोघांनीही लग्नाआधी एकमेकांना अनेक काळ डेट केलं होतं. लग्नानंतर काजोलने सिनेसृष्टीतून ब्रेक घेत कौटुंबीक आयुष्याला जास्त महत्त्व दिले. काजोल आणि अजय देवगण या दोघांनीही एकत्रित ‘इश्क’, ‘प्यार तो होना ही था’ यासोबतच अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेय.

पण बॉलिवूडसह सर्वत्र काजोल आणि अजयच्या नात्याची चर्चा कमी आणि तिच्या आणि शाहरुख खानच्या जोडीची सर्वाधिक चर्चा व्हायची. चाहत्यांनी काजोल आणि अजयच्या जोडीला जितका प्रतिसाद दिला नाही, त्याहून अधिक काजोल आणि शाहरुखच्या जोडीला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. काजोल आणि शाहरुखने ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

अजयला अनेकदा काजोल आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीचा हेवा वाटायचा, त्यामुळेच अजयने काजोलला शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी नकार दिला होता. अजयने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यासाठी नकार दिल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या. मसाला डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार, “चाहते काजोल आणि अजयच्या नात्याबद्दल कमी आणि काजोल आणि शाहरुखच्या मैत्रीबद्दल जास्त बोलायचे. अजयच्या मनात ही गोष्ट अनेकदा खटकायची. त्यामुळे अजयने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यासाठी साफ नकार दिला होता.”

शाहरुखने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजयने काजोलला त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी का मनाई केलीय?, असा त्याला प्रश्न विचारला होता. त्यावर शाहरुखने प्रतिक्रिया दिली की, “अजयने काजोल समोर अशी कोणतीही अट घातलीय की नाही याबद्दल माझ्याकडे कोणतीच माहिती नाही. अजयने काजोलला नकार दिल्याने जर ती माझ्यासोबत काम करणार नसेल, तर मी या निर्णयाचा पूर्णपणे आदर करेल. पण असं झालं आहे असे मला वाटत नाही. हे जरा विचित्र आहे. जर, गौरी सुद्धा अभिनेत्री असती तर, मी तिला कधीच कोणत्या गोष्टीत अडवलं नसतं. सोबतच मी तिला कोणाबरोबर काम करायचे आहे आणि कोणाबरोबर नाही, हे सांगितलं नसतं.”

काजोलच्या कामाबद्दल बोलायचं तर, काजोल सध्या ‘द ट्रायल’ या वेबसीरिजमुळे चर्चेत असून तिने या वेबसीरिजमध्ये पहिल्यांदाच वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन सीरिजचं हिंदी रूपांतरीत ‘द ट्रायल’ सीरिज आहे. या वेबसीरिजचे दिगदर्शन सुपर्ण वर्मा यांनी केले असून निर्मिती अजय देवगण, दीपक धर, मृणालिनी जैन व राजेश चड्ढा यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळीत ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजा गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

SCROLL FOR NEXT