Aishwarya Bachchan Viral Video: ऐश्वर्या राय बच्चन (Miss World 1994 Aishwarya Rai Bachchan)हे नाव केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध नाव आहे. 1994 मध्ये ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनली तेव्हा तिची सर्वत्र चर्चा झाली होती. तिने 19 नोव्हेंबर 1994 ला मिस वर्ल्डचा मुकुट परिधान करत तो किताब आपल्या नावे पटकावला. त्या दिवसांतील ऐश्वर्याचे सौंदर्य आणि निरागसपणाने उजळले आहे. ऐश्वर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या त्यावेळी जेमतेम 29 वर्षांची होती, त्यावेळी ती एका टूरमध्ये दिसून येत आहे. 1994-95 च्या मिस वर्ल्ड टूरच्या ऐश्वर्याचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने मरुन कलरची साधी साडी आणि फुल स्लीव्हज ब्लाउज परिधान केला होता. त्यानंतर ती वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. त्या तरुण वयातील ऐश्वर्याचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.
ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची जगभरात चर्चा आहे, मिस वर्ल्ड 1994 स्पर्धेत विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरं देत ऐश्वर्याने तो मिस वर्ल्डचा किताब पटकवला होता. स्पर्धेदरम्यान उपस्थित लोकांना तिच्या सौंदर्याची आणि प्रतिभेची खात्री पटली. ऐश्वर्याने केवळ तिच्या सौंदर्यामुळेच नाही तर तिच्याकडील ज्ञानामुळे मुकुट जिंकला होता. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा ताज घातला तेव्हा संपूर्ण देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. जेव्हा ऐश्वर्याला हा पुरस्कार मिळाला तेव्हा ती २१ वर्षांची होती.
86 देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. तिच्यानंतरही भारतातील अनेक सौंदर्यवतींनी मिस वर्ल्डचा मुकूट पटकावला, पण त्यावेळी ऐश्वर्याच्या सौंदर्याची जितकी चर्चा झाली तितकी इतर कोणत्याही भारतीय सौंदर्यवतीची चर्चा झाली नाही. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर ऐश्वर्याला बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या अनेक ऑफर्स मिळू लागल्या. त्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये दमदार पाऊल टाकत आपले नाव कमवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.