Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: भाईजानला वेड लागले प्रेमाचे, कोण आहे ती अभिनेत्री?

अभिनेता सलमान खान प्रोफेशनलपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच कायम चर्चेत राहिला आहे. 'कभी लव्ह लाइफ, कभी शादी' या विविध कारणांमुळे तो चर्चेत राहिला आहे.

Chetan Bodke

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तो प्रोफेशनलपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच कायम चर्चेत राहिला आहे. 'कभी लव्ह लाइफ, कभी शादी' या विविध कारणांमुळे तो चर्चेत राहिला आहे. सध्या चित्रपटसृष्टीत चर्चा आहे की, सलमानला त्याची नवीन साथीदार मिळाली आहे आणि तो सध्या तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

बहुतेकांना सलमानचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर असल्याचे ठाऊक होते, त्यामुळे त्याचे नाव सुद्धा बऱ्याच प्रमाणात नाव खराब झाले आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, आता सलमान पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. सलमान खान पूजा हेगडेला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. एवढेच नाही तर पूजा सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातही काम करत आहे.

उमेर संधूच्या एका ट्विटने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सलमान आणि पूजा रिलेशनशिपमध्ये असल्याचे उमेरचे म्हणणे आहे. उमेरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘ब्रेकिंग न्यूज… चित्रपटसृष्टीत आणखी एक नवं जोडपं समोर आले आहे. सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात पडल्याची चर्चा होत आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसनेही पूजाला त्याच्या दोन चित्रपटांसाठी साइन केले आहे. हे दोघे सध्या एकत्र वेळ घालवत असून सलमानच्या जवळच्या मित्रानेही याला दुजोरा दिला आहे.

पूजा लवकरच रणवीर सिंहसोबत 'सर्कस' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केले आहे. दरम्यान, 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंग सुरु झाली आहे आणि या दरम्यानच सलमान आणि पूजाच्या रिलेशनशिपच्या अफवाह सुरु झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nutmeg Milk: रात्री झोप येत नसेल तर? दुधात मिसळा स्वयंपाकघरातील हा पदार्थ

Mumbai : ९ जुलैला भारत बंद! मुंबईत शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार? काय सुरु असणार?

Viral Video: चक्क पोलिसांकडून चोरी! जनरल डब्यातील झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास केला, VIDEO व्हायरल

Nagpur News : नागपूरच्या १२ वर्षीय जयेशचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Dada bhuse : शालेय शिक्षण मंत्र्यांची 'दादा' गिरी; बंद पडलेल्या मराठी शाळेत कार्यालय थाटण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT