Nawazuddin Siddiqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनने सांगितले 'सेक्रेड गेम्स' विषयी मोठे सिक्रेट...

नवाजुद्दीनची 'सेक्रेड गेम्स' ही वेबसीरिज सर्वांना ठाऊक असेल. नवाजने गेल्या काही दिवसांपूर्वी 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजबद्दल काही खुलासे केले होते.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या कौशल्यावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. सोबतच नवाजुद्दीन सिद्दीकीला मनोरंजनसृष्टीत एक यशस्वी अभिनेता म्हणून देखील ओळखले जाते. खलनायक असो किंवा सकारात्मक व्यक्तिरेखा नवाजुद्दीन हा नेहमीच त्याच्या व्यक्तिरेखेत जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न करतो.

नवाजुद्दीनची 'सेक्रेड गेम्स' ही वेबसीरिज सर्वांना ठाऊक असेल. नवाजने गेल्या काही दिवसांपूर्वी 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजबद्दल काही खुलासे केले होते. या वेबसीरिजमध्ये त्याने 'गणेश गायतोंडे' हे पात्र साकारले होते. त्याच्या या पात्रावरुन त्याला बरेच ट्रोलही करण्यात आले होते. सोबतच नेटकऱ्यांनी त्याच्या भूमिकेवरुन अनेक मीम्सही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचे ते पात्र प्रेक्षकांच्या बरेच पसंदीस उतरले होते.

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2022 मध्ये नवाजुद्दीनने त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले. पहिल्यांदाच 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजची ऑफर त्याने नाकारली होती. त्या दरम्यान नवाजुद्दीनने सांगितले, "तेव्हा मला या वेबसीरिजसाठी पहिल्यांदा विचारण्यात आले तेव्हा त्यासाठी मी नकार दिला होता. मला वाटले होते की, ती एक टीव्ही सीरियल आहे. दरम्यान मला OTT बद्दल माहिती नव्हतं."

सोबतच त्याने पुढे सांगितले की, "तेव्हा मी त्यांना ओटीटीबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. ही वेबसीरिज एकाच वेळी 190 देशांमध्ये दिसणार आहे, असे मला सांगण्यात आले. पण त्यानंतरही माझी तिथे काम करण्याची इच्छा नव्हती. तरी सुद्धा अनुराग कश्यपने माझी साथ सोडली नाही आणि मला या सीरिजमध्ये काम करण्यासाठी पटवले." 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजने नवाजुद्दीनच्या आयुष्याला एक वेगळेच वळण दिले.

नवाजच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तो शेवटचा 'हिरोपंती 2' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका केली होती. टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच फ्लॉप झाला होता. लवकरच नवाजुद्दीन 'हड्डी' या चित्रपटात एका तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT