Sonali Phogat Death Latest Update  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, PA वर भावाने केले गंभीर आरोप

सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.

Nandkumar Joshi

Sonali Phogat Death | हिसार: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे. सोनाली फोगाट यांच्या फार्म हाउसवरील कॉम्प्युटर आणि लॅपटॉप गायब आहेत. सोनालीचा भाचा वकील विकास याने सोनालीचा स्वीय सचिव सुधीर सांगवान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तोच सोनालीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

सांगवान याने सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप विकासने केला आहे. दुसरीकडे, या प्रकरणात सोनाली फोगाट यांच्या स्वीय सचिवाला गोवा पोलिसांनी (Goa Police) ताब्यात घेतले. सुधीर सांगवान हा सोनाली यांच्यासोबत गोव्यात होता. कुटुंबीयांनीही सांगवानवर संशय व्यक्त केला.

सोनाली यांचा लहान भाऊ रिंकू यानेही सोनालीचा (Sonali Phogat) पीए सुधीर सांगवान याच्यासह त्याच्या मित्रावर गंभीर आरोप केला आहे. अन्नातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार आणि व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही केला आहे.

तसेच सोनाली फोगाट यांची संपत्ती हडपण्यासाठी आणि कट रचल्याचा आरोपही रिंकूने केला आहे. याबाबतची लेखी तक्रार त्याने गोवा पोलिसांकडे केली आहे. तसेच कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

याप्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्यातील पोलीस भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोग्य अधिकारी आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे स्पष्ट होत आहे.

फोगाट यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यांचे कुटुंबीय संशय व्यक्त करत आहेत. हरयाणाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT