Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फी जेलमध्ये जाणार? 'या' महिला नेत्याने केली मागणी, उर्फीने असं काय केलं?

बिग बॉस फेम उर्फी जावेद आपल्या अतरंगी कपड्यांनी नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असते.

Chetan Bodke

बिग बॉस फेम उर्फी जावेद आपल्या अतरंगी कपड्यांनी नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असते. तिला पोलीसांनी बेड्या ठोकल्या तरी, तिच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. या हटक्या कपड्यांमुळे तिला अनेकदा काहींनी खडेबोल ही सुनावले आहेत. आता नुकतेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीसांकडे ट्वीट करत मागणी केली की,'शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' चित्रा वाघ यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

त्यांच्या या ट्वीटला अनेक युजर्सने कमेंट केली आहे, एक युजर म्हणतो, 'बरोबर ताई अशा मुलींना काही वाटता की, नाही आम्हाला बघायला पण लाज वाटत आहे. ही रस्त्यावर उभी आहे.' तर आणखी एक जण म्हणतो, 'या बाईला रोखायला हव पण तिच्या आधी फॅशन डिझायनर वर कठोर कारवाई करायची गरज आहे.'

उर्फी बिग बॉसची स्पर्धक असून तिने अनेक मालिकेंमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोबतच ती अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करते. दुर्गा, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीच सीझन २, सात फेरों की हेराफेरी आणि अशा अनेक मालिकेंमध्ये तिने काम केलं आहे.

ती जितकी अभिनयानं प्रसिद्ध नसली तरी ती नेहमी मॉडेलिंगमुळे तरुणवर्गात कमालीची चर्चेत असते. तिच्या अनेक पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो. २०१५ मध्ये टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT