Bipasha Basu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bipasha Basu: कोण होतीस तू काय झालीस तू; बिपाशा बसूच्या व्हायरल फोटोमुळे चाहते थक्क

Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती पूर्वीच्या तुलनेत अधिक वजनदार दिसत आहेत.

Shruti Vilas Kadam

Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती पूर्वीच्या तुलनेत अधिक वजनदार दिसत आहेत. या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोकांनी दावा केला आहे की, बिपाशाचा लूक पूर्णपणे बदलला आहे. मात्र, या फोटोंची सत्यता तपासल्यावर वेगळीच माहिती समोर आली आहे.

या व्हायरल फोटोंमध्ये बिपाशा जिममधून बाहेर पडताना दिसत आहेत, आणि त्यांचं वजन वाढल्याचं दिसतं. मात्र, या फोटोमध्ये काही तरी गडबड आहे. अनेक अकाउंट्सनी हे फोटो शेअर केले आहेत, पण त्यापैकी बहुतांश अकाउंट्स अनवेरिफाइड आहेत. बिपाशाने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर तीन दिवसांपूर्वी काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती फिट दिसत आहेत. त्यामुळे, व्हायरल फोटो आणि तिच्या फोटोंमध्ये मोठा फरक असल्याचे दिसत नाही.

चाहत्यांनी या व्हायरल फोटोंवर प्रतिक्रिया देताना बिपाशाचा पाठिंबा दर्शवला आहे. एका नेटकऱ्याने तिच्या अधिकृत अकाउंटवर कमेंट करत लिहिलं, "किती लोक इथे बिपाशाचे व्हायरल फेक फोटो पाहून आले आहेत?" तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, "बिपाशा, अनेक लोक सोशल मीडियावर तुझे फेक फोटो शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की तुझा लूक पूर्णपणे बदलला आहे. पण तुला याचा विचार करण्याची गरज नाही, कारण हे लोक महत्त्वाचे नाहीत."

बिपाशा बसूने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी विवाह केला आणि त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. तिचा शेवटचा पूर्ण चित्रपट 'अलोन' २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ती 'वेलकम टू न्यूयॉर्क' (२०१८) या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Serum Cholesterol : सीरम कोलेस्ट्रोल म्हणजचे काय? तज्ज्ञांनी केला हा गंभीर खुलासा

Manoj jarange patil protest live updates: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या बीड जिल्हा कडकडीत बंदची हाक

Chirote Recipe : सणासुदीला खास! गणपतीसाठी स्वादिष्ट आणि खुसखुशीत चिरोटे बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

मराठा आंदोलन चिघळणार? आझाद मैदानावर पोलिसांचा फौजफाटा दाखल, VIDEO समोर

Viral Video: किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावर मारामारी, चार जणांनी कर्मचाऱ्याला धुतला, व्हिडीओ

SCROLL FOR NEXT