Kim Kardashian Auto Rickshaw Trip Instagram
मनोरंजन बातम्या

Kim Kardashian Auto Rickshaw Video : किम कर्दाशियनची इच्छा पूर्ण, मुंबईत येताच केला ऑटो रिक्षात प्रवास

Chetan Bodke

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत लग्नाला उपस्थित राहण्यासाठी देश-विदेशातून पाहुणे भारतात यायला सुरूवात झाली आहे. काही तासांपूर्वीच कर्दाशियन बहिणी भारतात आल्या आहेत. सध्या त्या मुंबईत असून त्या दोघेही राधिका- अनंतच्या लग्नाला उपस्थिती लावणार आहेत. किम कर्दाशियनला भारतात आल्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये ऑटो रिक्षाने प्रवास करायची तिची इच्छा होती. अखेर तिची ती इच्छा पूर्ण झाली असून सोशल मीडियावर तिचा मुंबईच्या रस्त्यावर सफर करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काल संध्याकाळी किम कर्दाशियन आणि ख्लो कर्दाशियन दोघीही भारतात आल्या आहेत. भारतात आल्यानंतर त्यांचं मुंबईच्या कलिना विमानतळावर भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले. नुकताच किम कर्दाशियन आणि तिची बहिण ख्लो कर्दाशियन यांनी मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या ऑटो रिक्षामध्ये दक्षिण मुंबईची सफर केली आहे. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. भारतामध्ये येण्यापूर्वी तिने ऑटो रिक्षामध्ये सफर करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिची इच्छा परिवहन आणि वाहतूक विभाग मान्य करणार का ? अशी सोशल मीडियावर चर्चा होत होती.

अखेर तिची इच्छा पूर्ण झाली असून तिच्या व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चा होत आहे. किम कर्दाशियनने ऑटो रिक्षाची राईड करतानाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. कार्दशियन बहिणी दोघीही पहिल्यांदाच भारतात आल्या आहेत. किम कर्दाशियन आणि ख्लो कर्दाशियन भारतात अनंत-राधिकाच्या लग्नासाठी आल्या आहेत. दोघीही पेशाने अमेरिकन मॉडेल आहेत. त्या नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे जगभरामध्ये चर्चेत असतात. कार्दशियन बहिणींना भेटण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उत्साहित आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दोघीही खास लग्नासाठी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर तरूण तहलियानी यांनी डिझाईन केलेला आऊटफिट वेअर करणार आहेत.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै अर्थात आज मुंबईमध्ये पार पडणार आहे. तर, १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ पार पडेल. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर, १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लग्नाच्या ह्या तिनही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी अंबानी कुटुंबीयांनी खास ड्रेस कोड ठेवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT