Chetan Bodke
प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांचं भारत सवारीची ही काय पहिली वेळ नाही.
प्रियंका मध्यंतरी भारतात आली होती, त्यानंतर ती पुन्हा एकदा भारतात आली आहे.
सध्या प्रियंका आणि निक दोघेही मुंबईतल्या रस्त्याचा आनंद रिक्षातून घेताना दिसत आहेत.
प्रियंका आणि निकचं हे खास फोटोशूट सध्या सोशल मीडियावर कमालीचं चर्चेत आलं आहे.
या दोघांनीही हे फोटोशूट काल केलं आहे.
रिक्षावाला सुद्धा मोठ्या आश्चर्याने या जोडीकडे पाहत आहे.
प्रियंकाने फोटोत ६५ वर्ष जुन्या विंटेज बनारसी पटोला साडीचा ड्रेस बनवला.
यात चांदीचे धागे, खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंग केले आहे.
६५ वर्ष जुनी साडी वापरुन त्याचा ड्रेस बनवून फोटोशूट केल्याने प्रियंकाची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे.