Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Movie: 'वाजीव दादा' सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

झापुक झुपूक' या चित्रपटाचं एक भन्नाट गाणं 'वाजीव दादा' प्रदर्शित झालंय. पहिल्या दोन गाण्यांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर 'झापुक झुपूक' सिनेमातील हे खास हळदीचे गाणे सध्या कमाल करत आहे.

Manasvi Choudhary

अख्ख्या महाराष्ट्रात झापुक झुपूकचं वेड पसरलय. सर्वत्र सूरज चव्हाणच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे. अशातच आता 'झापुक झुपूक' या चित्रपटाचं एक भन्नाट गाणं 'वाजीव दादा' प्रदर्शित झालंय. पहिल्या दोन गाण्यांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर 'झापुक झुपूक' सिनेमातील हे खास हळदीचे गाणे सध्या कमाल करत आहे. मराठी हळदी गाण्याच्या शोधात असाल, तर हे गाणे तुमच्या लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये अवश्य जोडा! मस्तीने पुरेपूर आणि उत्साह ने भरपूर असलेलं असं हे पारंपरिक उत्साहात भर टाकणार हे नक्कीच. हळदीच्या तेजस्वी पिवळ्या रंगाप्रमाणेच हे मजेदार गाणं आहे जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलय आणि नक्कीच तुमचं वातावरण आनंद आणि उर्जेने भरून टाकेल.

'वाजीव दादा' हे गाणं सूरज चव्हाण सह जुई भागवत हेमंत फरांदे आणि त्याच्या बिग बॉस सीझन पाच मधील काही कलाकारांवर म्हणजेच जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी, वैभव चव्हाण, इरिना आणि पुरुषोत्तम पाटील यांच्यावर चित्रित केलं गेलय. गाण्यात ह्या सर्वांचा कल्ला आणि एकमेकांसोबतची जुगलबंदी पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे पहिल्यांदा मेटा ने जिओ स्टुडिओज च्या सहयोगाने मराठी गाणं त्यांच्या मुंबई ऑफिस मधून रिलीज केलं. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे तसेच सूरज चव्हाण आणि त्याचे काही बिग बॉसच्या घरातील मित्र पुरुषोत्तम पाटील, जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी हे देखील उपस्थित होते.

'वाजीव दादा' ह्या गाण्याला गायक चंदन कांबळे आणि ज्ञानेश्वरी कांबळे ह्यांनी आपला आवाज दिला आहे. तर संगीतकार आणि लेखक खुद्द चंदन कांबळे हे आहेत. प्रत्येकालाच थिरकायला लावणारं हे गीत आहे. तर चला तर आता हळदी समारंभ भारतीय पद्धतीने 'वाजीव दादा' च्या अंदाजात साजरी करायला एका नवीन गाण्याची भर!

सिनेमाची भरभरून होणारी चर्चा, गाण्यांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि आज खुद्द मेटा च्या ऑफिस मध्ये "वाजीव दादा" हे गाणं रिलीज झालं म्हणून आपला आनंद व्यक्त करत दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, " चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सर्वत्र उत्सुकतेच वातावरण आहे. झापूक झुपूक शीर्षक गीत आणि ट्रेलर ला पण भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आज माझ्या झापूक झुपूक चित्रपटाच तिसरं गाण वाजीव दादा" हे हळदीच गाण मेटा च्या सहयोगाने रिलीज केलं गेलं त्यासाठी मी आभारी आहे कारण त्यांनी मराठी चित्रपटाच्या ह्या गाण्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य केलं आहे. जिओ स्टुडिओज तर बाईपण भारी देवा पासूनच माझ्या सोबत माझ्या पाठीशी खंबीरपणे माझी साथ देतोय”.

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे !!

Back Neck Blouse Design: बॅकलेस ब्लाऊजच्या या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन, लूक दिसेल एकदम भारी

Municipal Elections Voting Live updates : मराठमोळ्या कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: 'बाबा खूप कर्जात बुडालेत'; मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारला मुलीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

मतदान केंद्राबाहेर आमचा भगवा स्कॉड; बेकायदेशीर काही दिसले की जागेवर फोडणार; संजय राऊतांचा इशारा

Brain Tumor: अचानक ताप येण्यासोबत ही ४ लक्षणं दिसली तर असू शकतो ब्रेन ट्यूमरचा धोका; कसे ओळखाल संकेत?

SCROLL FOR NEXT