Bigg Boss Marathi News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: ...तर भविष्यात मी बिग बॉसचा अँकर होईन; अभिजीत बिचुकलेने व्यक्त केला विश्वास

मराठी बिग बॉसचे लवकरच चौथे पर्व सुरू होत असल्याने चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: मराठी बिग बॉसचे लवकरच चौथे पर्व सुरू होत असल्याने चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. गेल्या तिनही पर्वांसोबत या ही पर्वात महेश मांजरेकरांनी सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. कलाकारांमधील वाद-विवाद, कार्यक्रमातील स्पर्धकांचा तंटा या गोष्टींनी प्रेक्षकांना कार्यक्रमात गुंतवून ठेवतात. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकरांनी बिचुकले संबंधित वक्तव्य केले होते. अभिजीत बिचुकलेने त्या प्रश्नावर खणखणीत प्रत्युत्तर केले आहे.

नेहमीच बिचुकले कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतोच. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातील वादग्रस्त चेहरा अशी अभिजितची ओळख. अभिजितने महेश मांजरेकरांविषयी काही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिग बॉस ४ च्या लॉचिंग कार्यक्रमावेळी महेश मांजरेकरांना विचारण्यात आले की, चौथ्या पर्वात कोणकोणत्या स्पर्धकांना तुम्हाला बघायला आवडेल? त्यावेळी मांजरेकर म्हणतात, अभिजीत बिचुकले यांना पुन्हा पाहायला आवडणार नाही. 'बिचुकले खेळात सहभागी होत नव्हता. त्याचा तो विशिष्ट गुणधर्म आहे पण तो किती दिवस बघणार. घरामध्ये अष्टपैलू खेळाडू असणे गरजेचे आहे. प्रत्येक खेळाडूचे वेगवेगळेपण आहे.'

पण हे उत्तर बिचुकलेला पटलेले नाही. महेश मांजरेकरांच्या उत्तरावर बिचुकलेने प्रत्युत्तर केले, 'महेश मांजरेकर पैसे घेऊन तिथे नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचे?. कार्यक्रमाला टीआरपी कोणामुळे आला?, दुसरे पर्व कोणामुळे गाजले?, एंडमोल कंपनीने मला नावारुपाला आणले. याची कंपनीला जाण असेल. तर ते मांजरेकरांच्या वक्तव्याला महत्व देणार नाहीत. भविष्यात मी बिग बॉसचा अँकर होईन, असा मला विश्वास आहे'. असे विधान बिचुकलेने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Drink: १५ दिवस लिंबू- लसून अन् हळदीचे पाणी प्यायल्याने काय होते?

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT