Bigg Boss
Bigg Boss  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 16 : या दिवसापासून सुरु होणार सलमानच्या बिग बॉसचा नवा सीझन!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Season 16 Release Date | मुंबई : 'बिग बॉस'(Bigg Boss) हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी रिअॅलिटी शो आहे. बिग बॉसचे आतापर्यंत १५ ब्लॉकबस्टर सीझन झाले आहेत. बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पाहिला जाणारा रिअॅलिटी शो आहे. सीझन १५ च्या जबरदस्त लोकप्रियतेनंतर प्रेक्षकांना नवीन सीझनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे.

या सीझनमध्ये नवीन काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. या शोच्या सुरुवातीच्या तारखांवर बरीच अटकळ सुरू होती. आधी सप्टेंबरमध्ये आणि नंतर ऑक्टोबरमध्ये सुरू होईल असं म्हटलं जात होतं, पण आता या शोच्या तारखेबाबतचा सस्पेन्स संपला आहे.

सुपरस्टार सलमान खान(Salman Khan) होस्ट करत असलेला 'बिग बॉस सीझन १६' १ ऑक्टोबरपासून सोनी टीव्ही प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सलमान खान प्रोमोजच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या शोमध्ये आता कोण-कोण स्पर्धक सहाभागी होणार हे अजूनही शोच्या निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

गेल्या सीझनमध्ये, तेजस्वी प्रकाश या शोची विजेती म्हणून झाली होती, तर प्रतीक उपविजेता ठरला होता. 'बिग बॉस १५' ने धमाकेदार सुरुवात केली आणि टीआरपी चार्टवर चांगली कामगिरी केली होती, परंतु काही आठवड्यांनंतर या शो रेटिंग कमी होऊ लागली होती. आता 'बिग बॉस सीझन १६' ला प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

'लॉक अप' सीझन १ चा विजेता मुनव्वर फारुकी हा शोचा पहिला कन्फर्म केलेला स्पर्धक आहे. 'लॉक अप' नंतर कॉमेडियन 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाला होता, पण काही कारणांमुळे त्याला या शोमधून बाहेर काढण्यात आले, पण आता तो 'बिग बॉस सीझन १६' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मतदार केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT