Elvish Yadav Sent Judicial Custody Saam Tv
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav च्या अडचणीत वाढ, न्यायालयीन कोठडीत रवानगी; आतापर्यंत नेमकं काय घडलं?

Priya More

Elvish Yadav Arrested:

प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस (Bigg Boss) ओटीटी विनर एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या चर्चेत आहे. एल्विश यादवच्या अडचणी काही संपायचे नाव घेत नाहीये. नोएडा पोलिसांनी (Noida Police) एल्विश यादवला रविवारी अटक केली. रेव्ह पार्टींमध्ये विषारी सापांच्या विषाची तस्करी प्रकरणात एल्विशला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता एल्विश यादवच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणात नोएडा पोलिसांनी आधीच ५ जणांना अटक केली होती.

रविवारी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर एल्विश यादवची नोएडातील एका रुग्णालयामध्ये मेडिकल चेकअप करण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सूरजपूर न्यायालयामध्ये नोएडा पोलिसांनी याप्रकरणी एल्विश यादवला हजर केले होते. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. न्यायालयाच्या आवारातील हा व्हिडीओ आहे. पोलिस एल्विशला न्यायालयामध्ये घेऊन जात असून तो हसताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सूरजपूर न्यायालयामध्ये एल्विश यादवला हजर करण्यात आले होते. नोएडा पोलिसांनी २ नोव्हेंबर २०२३ ला नोएडाच्या सेक्टर ५१ च्या सेवरोन बँक्वेट हॉलमधूनल ५ जणांना अटक केली होती. याठिकाणावरून पोलिसांनी ५ साप जप्त केले होते. यामध्ये ५ कोब्रा, १ अजगर, २ दोन तोंड असलेले साप आणि एक रेड स्कॅनचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्यांनी चौकशीदरम्यान या सापांचे विष रेव्ह पार्टीत वापरले जात असल्याचे सांगितले होते. याप्रकरणात पोलिसांनी एल्विश यादवला मुख्य आरोपी बनवले होते.

एल्विश यादवने नोएडा पोलिसांना आव्हान दिले होते. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितले होते की, 'नोएडा पोलिसांनी सर्पमित्रांना रस्त्यावरून पकडले आणि त्यांच्यावर रेव्ह पार्टीत सहभागी झाल्याचा आरोप केला होता. नोएडा पोलिसांनी रेव्ह पार्टीमध्ये माझी उपस्थिती सिद्ध करून दाखवावी.' जर नोएडा पोलिसांनी हे आरोप सिद्ध करून दाखवले तर मी कपडे काढून नाचेल असे तो म्हणाला होता.

३ नोव्हेंबर २०२३ ला पीएफए सदस्याने एल्विश यादवविरोधात नोएडा सेक्टर -४९ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी नोटीस मिळाल्यानंतर एल्विश यादव रात्री उशिरा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाला होता. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी एल्विश यादवने पीएफएच्या टीमवर खंडणीचा आरोप केला. १७ मार्च २०२४ रोजी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

SCROLL FOR NEXT