Elvish Yadav Post Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav: 'वेळ दिसत नाही पण...', तुरुंगातून बाहेर येताच एल्विश यादवची पहिली पोस्ट चर्चेत

Elvish Yadav First Post After Getting Bail: काही दिवसांपूर्वी त्याच्यावर युट्यूबर सागरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सापांच्या विषाची तस्करी प्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या या दोन्ही प्रकरणांमध्ये एल्विश यादवला दिलासा मिळाला आहे.

Priya More

Elvish Yadav Post Viral:

'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) विनर आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadeav) सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर युट्यूबर सागरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सापांच्या विषाची तस्करी प्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या या दोन्ही प्रकरणांमध्ये एल्विश यादवला दिलासा मिळाला आहे. ५ दिवसांच्या तुरुंगवासानंतर एल्विश यादवची जामीनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विशने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

एल्विश यादवने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये 'वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवून जाते.', असे लिहिले आहे. सध्या एल्विश यादवची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टला २९ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विश यादवने त्याचा पहिला फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. यूट्यूबर दोन महागड्या कार्समध्ये अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. त्याने शर्ट, जिन्स पँट आणि त्यावर ब्लॅक कलरचे जॅकेट सोबतच गॉगल लावून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

यूट्यूबर एल्विश यादव त्याच्या नवीन फोटोमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. काही युजर्सनी कॉमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या वडिलांनी दिलेल्या विधानाचा उल्लेख केला आहे. एल्विशच्या वडिलांनी सांगितले होते की, 'त्यांच्या मुलाकडे कोणतीही महागडी कार नाही. मित्रांच्या गाड्या उधार घेऊन तो फोटोशूट करून घेतो.' दरम्यान, एल्विश यादव अनेकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत असतो. तो अनेकदा त्याच्या यूट्यूब चॅनलवरून वादग्रस्त विधाने करताना दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT