Bigg Boss OTT 3 Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 Contestant : दिल्लीची हॉट वडापाव गर्ल ते मॉडेल सना सुल्तान', Bigg Boss OTT 3 मध्ये येणार एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक; पाहा संपूर्ण यादी!

Bigg Boss OTT 3 Contestant List : कायमच टेलिव्हिजनसह ओटीटीवर ही वादग्रस्त ठरणारा ‘बिग बॉस’ शो आजपासून सुरू होत आहे. सध्या सोशल मीडियावर बिग बॉसमधील संभाव्य स्पर्धकांची यादी व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

कायमच टेलिव्हिजनसह ओटीटीवर ही वादग्रस्त ठरणारा ‘बिग बॉस’ शो सुरू होत आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’ हा शो २१ जूनपासून सुरू होत आहे. या शोचं होस्टिंग सलमान खान करणार नसून बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ म्हणून प्रकाशझोतात आलेला अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर बिग बॉसमधील संभाव्य स्पर्धकांची यादी समोर आलेली आहे.

‘विरल भयानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम हॅण्डलने दिलेल्या माहितीनुसार, या शोमधील कन्फर्म स्पर्धकांची यादी निश्चित झाली आहे. त्यामध्ये कलाकारांपासून ते यूट्यूबर्सपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सहभागी होणारा पहिला स्पर्धक आहे सई केतन राव. याने अनेक टिव्ही सीरियलमध्ये काम केले आहे. दुसऱ्या स्पर्धकाचे नाव पौलोमी पॉलो दास असं नाव आहे. हिने इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल २०१६ या शोच्या माध्यमातून तिच्या रील लाईफला सुरुवात झाली. तिसरी स्पर्धक सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर आणि मॉडेल सना सुल्तान आहे.. ती आजवर अनेक पंजाबी व्हिडीओ साँग्जमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

तर चौथी स्पर्धक टिव्ही अभिनेत्री सना मकबूल आहे. 'कितनी मोहब्बत है', 'इस प्या को क्या नाम दूं' या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’मधील पाचवा स्पर्धक उत्तर प्रदेशची अभिनेत्री आणि इन्सफ्लूएन्सर शिवानी कुमार असेल. तर सहावा स्पर्धक इन्फ्लूएन्सर विशाल पांडे आहे. दिल्लीची ‘वडा पाव गर्ल’ म्हणून फेमस असलेली सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर चंद्रिका गेरा दीक्षितही आहे. ही बिग बॉसच्या घरातील सातवी स्पर्धक आहे.

रॅपर नेजी हा सुद्धा बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. नेजी हा रणवीर सिंहच्या 'गली बॉय'चा खूप मोठा फॅन आहे. बिग बॉसच्या घरातील नऊवा स्पर्धक कुस्तीपटू नीरज गोयत हा आहे. तर दहावा स्पर्धक ज्येष्ठ पत्रकार दीपक चौरासिया हे आहेत.

अकरावी स्पर्धक टिव्ही अभिनेत्री चेष्ठा भगत आहे. चेष्ठाने ‘कुछ रंग प्यार के’ मध्येही काम केले आहे. तर डीजे आणि रियलिटी शोचा कलाकार निखिल मेहता हा बारावा स्पर्धक आहे. तर तेरावी स्पर्धक अभिनेत्री आणि टॅरो कार्ड रीडर मुनीषा खाटवानी आहे. अर्थात ही सर्व नावं अधिकृत आहेत की नाही हे तर शो ऑन एअर झाल्यानंतरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India: टीम इंडियाच्या माजी खेळाडूला पोलिसांकडून अटक; दारूच्या नशेत अनेक गाड्यांना ठोकल्याची माहिती

Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत,अजित पवारांचं विमान अपघातात निधन

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCA ची माहिती

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, दुर्घटनेचा पहिला व्हिडिओ अन् फोटो समोर

Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT