Suraj Chavan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Biography : Bigg Boss काय ते माहित नाही, फक्त टिव्हीवर दिसणार म्हणून 'शो'मध्ये आला अन् ट्रॉफी उचलली, सूरजचा 'गुलीगत' प्रवास

Suraj Chavan Bigg Boss Marathi Winner: सोशल मिडिया स्टारपासूनचा सुरज चव्हाणचा बिग बॉसपर्यतचा प्रवास अत्यंत खास आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेचा बारामतीचा रिलस्टार सुरज चव्हाण ठरला आहे. 'गुलिगत धोका' या नावाने बिग बॉस गाजवणाऱ्या सुरज चव्हाणला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सुरजने त्यांच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.सोशल मिडिया स्टारपासूनचा सुरज चव्हाणचा बिग बॉसपर्यतचा प्रवास अत्यंत खास आहे. याचनिमित्ताने आज आपण सुरज चव्हाण कोण आहे? बिग बॉसमध्ये त्याची निवड का झाली? याविषयी जाणून घेऊया.

सुरज चव्हाण हा मूळचा बारामतीमधील मोडवे गावचा रहिवासी आहे. सुरजच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. तो लहान असतानाच आई- वडिलाचं निधन झालं. सात बहिणीचा एकुलता एक भाऊ सूरजने आता मोठी भरारी घेतली आहे. सुरज चार वर्षाचा असताना वडिलाचं छत्र हरवलं. सुरजच्या वडिलांच्या निधनाचा धक्का त्याच्या आईला बसला. त्यांना ते सहन झाले नाही. यामुळे काहीवर्षांनी सूरजच्या आईचे देखील निधन झाले. सुरज आणि त्याच्या सात बहि‍णींचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला. आई वडील नसल्याने सुरजला लहानपणी काम करण्यास भाग पडले. लहानवयात सूरज गंवडी काम करत होता.यामुळे त्याला शिक्षण घेता आले नाही. सुरजचे आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

सुरज मोलमजुरी करत असताना त्याला टिकटॉकबद्दल समजलं.मेहनत करून सुरजने स्वत:साठी फोन घेतला. दिवसातून एक- दोन व्हिडीओ सुरज टिकटॉकवर बनवायचा. सुरजच्या व्हिडीओ व्हायरल झाल्या. सुरजच्या कॉमेडी व्हिडीओंनी नेटकऱ्यांना खिळवून ठेवलं. यानंतर टिकटॉकला बंदी आली. अशातच सुरजला शॉर्ट फिल्मसाठी ऑफर येऊ लागल्या दरम्यान त्याला इनस्टाग्रामबद्दल माहिती मिळाली. इन्स्टाग्रामवर सूरज व्हिडीओ बनवू लागला नंतर सुरजने युट्यूबवर त्याचे अकाउंट सुरू केले. तिथे देखील तो चांगलाच व्हायरल होऊ लागला. सुरजला युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळू लागले.

सुरजला त्याच्या सूरजला टिक टॉकवर व्हिडीओ बनवायची आवड निर्माण झाली. दररोज नवनवीन कॉमेडी व्हिडीओ सुरज बनवू लागला. काही दिवसांनी सुरज त्यांच्या बहिणी आणि भांवासोबत व्हिडीओ बनवायचा. हटके कॉमेडी व्हिडीओमुळे सुरज व्हायरल होऊ लागला. सुरजचे 'गोलीगत', 'बुक्कीत टेंगूल' हे डायलॉग चांगलेच फेमस झाले. काहीदिवसांनी टिकटॉत बंद झाले. नंतर त्याच्या मित्रांनी त्याला इन्स्टाग्रामबद्दल सांगितले. सुरज इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवू लागला. सुरजच्या कॉमेडी व्हिडीओला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

सोशल मीडियावर प्रसिद्ध असल्याने बिग बॉस मराठीमध्ये सुरजची निवड झाली. सुरूवातीला बिग बॉसमध्ये येण्यासाठी सुरज तयार नव्हता. बहिण व काही जवळच्या मंडळीनी सुरजला समजवल्यानंतर सुरज शोमध्ये येण्यासाठी तयार झाला. बिग बॉसच्या घरातून देखील सुरज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. बिग बॉसमुळे सुरज चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. बिग बॉसमुळे सुरजला नवीन ओळख मिळाली आहे. आगामी काळात सुरज चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. राजाराणी असं सुरजच्या चित्रपटाचं नाव आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT