Bigg Boss Marathi Season 5 Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Season 5 : "मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर..."; गोलीगत सूरजने अंकिताला स्पष्टच सांगितलं

Suraj Chavan : राग आल्यावर सूरज काय करतो याबद्दल त्याने अंकिताशी बातचीत केली आहे. यावेळी त्याने घराचा उल्लेख करत खरची आठवण येत असल्याचं देखील सांगितलं.

Ruchika Jadhav

बिग बॉस मराठी सुरू होताच घरातील सर्व स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवण्यास सुरूवात केली आहे. सर्व स्पर्धकांमध्ये गोलीगत सूरज घरातील खेळात जास्त दिसत नसला तरी त्याने आपल्या प्रेमळ स्वभावाने घरातील सदस्य आणि बाहेरील सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नुकताच सूरजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सूरज त्याच्या रागाबद्दल सांगताना दिसतोय.

सूरजला येतेय गावाची आठवण

पुढील भागाचा एक प्रोमो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. @trpmarathi या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सूरज अंकिता आणि पॅडी दादासह गप्पा मारत आहे. त्यांच्याशी संवाद साधताना तो आपल्या गावाचा उल्लेख करतो. सूरज म्हणतो की, "काही झालं तरी गाव महत्वाचं आहे मला. कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असं मला झालंय. इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो." असं सूरजने म्हटलं आहे.

अंकिता सूरजला यावेळी सांगते की अशावेळी आपण आपल्या भावनांना कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यावर सूरज म्हणतो की, "मी एकदम साधा माणूस आहे. पण राग आला तर मी पुढचं मागचं बघत नाही. इथे मी स्वत:ला खूप कंट्रोल केलंय.", असं स्पष्ट शब्दांत तो अंकिताला सांगतो.

सूरज गावी राहणारा आणि निरक्षर मुलगा आहे. मात्र तरीही त्याच्या रिल्सने आणि गाण्यांनी साऱ्यांच्या मानावर राज्य केलं आहे. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर कॅप्टनसी मिळाल्यावर सूरज थोडं फार बोलताना दिसू लागला आहे. आजच्या भागात तुम्हाला सूरज पॅडी दादाला मसाज देत असल्याचं सुद्धा पहायला मिळणार आहे. समोर आलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये एक सूरज पॅडी दादाचे हात पाय दाबत आहे. सूरज करत असलेला हा मसाज पाहून पॅडी दादा त्याला म्हणतात की, "तुला मसाज काय असतो तेच दाखवतो"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT