Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात होणार वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री ? रितेशने स्पर्धकांना दिला 'भाऊचा धक्का'

Bigg Boss Marathi 5 Latest Update : दुसऱ्या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर गेला नाही. पण या नॉमिनेशन प्रक्रियेत रितेश देशमुखने प्रेक्षकांच्या समोर एक मोठा ट्वीस्ट ठेवला आहे.

Chetan Bodke

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्याच आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात जोरदार राडा सुरू झाला आहे. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आहे. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणता स्पर्धक बाहेर जाणार याची चर्चा सुरू होती. पण दुसऱ्या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर गेला नाही. पण या नॉमिनेशन प्रक्रियेत रितेश देशमुखने प्रेक्षकांच्या समोर एक मोठा ट्वीस्ट ठेवला आहे.

दुसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण, घन:श्याम ( छोटा पुढारी), पॅडी कांबळे, निखिल दामले, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे सदस्य नॉमिनेट झाले होते. आता या स्पर्धकांमधून बाहेर कोण जाणार ? याची गेल्या अनेक स्पर्धकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. पण दुसऱ्या आठवड्यात स्पर्धकांना गुड न्यूज देत नॉमिनेटेड सदस्यांना ट्वीस्टचा धक्का दिला आहे.

'भाऊचा धक्का'वर रितेशने सर्वात आधी सूरज चव्हाणला सेफ केलं आणि त्यानंतर योगिता चव्हाण, निखिल दामले आणि निक्की तांबोळीला सेफ केले. त्यानंतर या आठवड्यातील बॉटम दोनमध्ये पॅडी कांबळे आणि छोटा पुढारी घन:श्याम दरवडे होते. पण या आठवड्यात घराचा निरोप कोणीही घेतला नाही.

दुसऱ्या आठवड्यामध्ये नॉमिनेट असलेले स्पर्धक आता तिसऱ्या आठवड्यातही नॉमिनेट असणार आहेत. नॉमिनेशनच्या यादीमध्ये कोणताही बदल होणार नाही. रितेशने 'भाऊचा धक्का'वर तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्ड स्पर्धक येणार असल्याची माहिती दिली आहे.

आजच्या एपिसोडमध्ये हा वाईल्ड कार्ड स्पर्धक येण्याची शक्यता आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक नेमका कोण असणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या वाईल्ड कार्ड स्पर्धक आल्यानंतर घरात कोणता टास्क होणार? इतर स्पर्धकांच्या खेळात आणखी काही बदलणार होणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT