Riteish Deshmukh Fee In Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी ५'च्या होस्टिंगसाठी किती पैसे घेतो रितेश देशमुख? आकडा पाहून व्हाल चकीत

Riteish Deshmukh Fee In Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनसाठी किती मानधन घेतोय, याची चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

सध्या प्रेक्षकांमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. २८ जुलैपासून या सीझनला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात वादाचे खटके उडायला सुरुवात झाली आहे. यंदाचा सीझन प्रेक्षकांसाठी एकदम वेगळा असून थीम आणि खेळण्याच्या पद्धतीमध्येही बदल झाला आहे. विशेष म्हणजे या सीझनचा होस्टही बदलला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच होस्टिंग महेश मांजरेकर करत नसून रितेश देशमुख करत आहे.

सध्या रितेशच्या होस्टिंगची प्रेक्षकांमध्येही आणि स्पर्धकांमध्येही जोरदार चर्चा होत आहे. रितेश देशमुख नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि खास शैलीमुळे चर्चेचा विषय ठरतोच. अशातच सध्या रितेश ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनसाठी किती मानधन घेतोय, याची चर्चा सुरू आहे. नुकतेच Filmybeat ने रितेशच्या मानधनाचे वृत्त दिले आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनसाठी रितेश देशमुखने दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पेक्षाही जास्त मानधन घेतल्याचे कळत आहे. ‘Filmybeat ‘ने दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’च्या याआधीच्या सीझनसाठी एका एपिसोडसाठी २० ते २५ लाख इतके मानधन घेत होते.

‘Filmybeat’ ने अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या पर्वासाठी नेमकं किती मानधन घेतो याबाबतचा खुलासा केला आहे. रितेश प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम आकारत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कदाचित रितेश एका एपिसोडसाठी सुमारे ३०-४० लाख रुपये आकारत असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT