Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : कोण आहेस तू चल निघ..., निक्की आणि जान्हवीमध्ये पुन्हा राडा; पाहा VIDEO

Nikki-Janhvi Fight : 'बिग बॉस मराठी' च्या घरात निक्की आणि जान्हवीने राडा घातला आहे. भांडणाचे नवे कारण जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी' ची चर्चा पाहायला मिळत आहे. घरातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नुकताच 'बिग बॉस मराठी'चा नवीन प्रोमो आऊट झाला आहे. यात निक्की (Nikki Tamboli ) आणि जान्हवी ( Jahnavi Killekar) भांडताना दिसत आहेत.

बिग बॉसच्या ( Bigg Boss Marathi ) घरात प्रत्येक वेळी काय चालू असते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. दिवसेंदिवस निक्कीची मनमानी वाढत जात आहे. यात अजून एक भर म्हणजे निक्कीने घरातील ड्युटी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निक्की आणि जान्हवीमध्ये जेवण बनवण्यावरून मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. निक्कीच्या अशा वागण्यावर संपूर्ण घरालाच तिचा प्रचंड राग आलेला आहे. बिग बॉसच्या घरात हल्ली रोज भांड्याला भांड लागून मोठे वाद होत आहेत. आज स्वयंपाक हे वॉर मैदान होणार आहे.

'बिग बॉस मराठी' च्या घरातील भांडणे दिवसेंदिवस वाढत जात आहेत. मात्र अनेक वेळा भांडणांमध्ये निक्कीचा समावेश असतोच. निक्कीचा स्वभाव घरच्यांना दिवसेंदिवस त्रास देऊ लागला आहे. तसेच दोन्ही टीममध्ये देखील रोज खटके उडताना पाहायला मिळत आहेत.

बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये असे दिसत आहे की, जान्हवी निक्कीला म्हणते 'तुला थोडी तरी लाज वाटत असेल तर मी बनवलेले जेवण तू जेवणार नाहीस.' तर यावर निक्कीचं उत्तर येत की, 'माझ्या वाकड्यात गेलं तर मी गळाच पकडत असते.' निक्कीची ही भाषा घरात अनेकांना खटकत आहे. निक्की आणि जान्हवीचा काय धुमाकूळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

SCROLL FOR NEXT