Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: महाराष्ट्राचा नंबर वन 'नॉन फिक्शन शो'; बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे? वाचा सविस्तर

Bigg Boss Marathi Grand Finale: 'बिग बॉस मराठी'च्या सर्वात जास्त गाजलेल्या या सीझन 5चा भव्यदिव्य बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले लवकरच होणार आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'च्या सर्वात जास्त गाजलेल्या या सीझन 5चा भव्यदिव्य बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले येत्या 6 ऑक्टोबरला दिमाखात पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनप्रमाणेच रितेश भाऊंनाही महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. पाहता पाहता हा महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो ठरला.

रितेश भाऊंची लयभारी स्टाईल, तरुणांमध्ये त्यांची असलेली क्रेझ ,त्यांची धमालमस्ती, कल्ला आणि सदस्यांमध्ये त्यांचा असलेला आदरयुक्त दरारा या सर्वच गोष्टींमुळे हा सीझन गाजला. रितेश यांच्या 'भाऊच्या धक्क्या'ने टीआरपीचे उच्चांक गाठले. प्रत्येक वीकेंडला सदस्यांची शाळा घेण्यासोबत त्यांची पाठ थोपटण्याचं कामदेखील रितेश भाऊंनी त्यांच्या स्टाईलने केलं. लाडक्या भाऊंनी 'बिग बॉस'प्रेमींवर आपली छाप पाडली. आपल्या स्टाईलने त्यांनी 'बिग बॉस मराठी'ला एक वेगळंच ग्लॅमर आणलं. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत सर्वांनाच या सीझनने अक्षरशः वेड लावलं.

'बिग बॉस मराठी' दररोज न चुकता पाहणं हा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या दिनचर्येचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आज घरात काय घडणार? कोण कसा खेळ खेळतोय? कोण काय रणनीती आखतोय? कोणाचा प्रवास कधी संपणार? अशा अनेक चर्चा नेटकरी करताना दिसून येत आहेत. प्रेक्षकांच्या या कार्यक्रमाला आणि रितेश भाऊंच्या होस्टिंगला मिळत असलेल्या उत्स्फू्र्त प्रतिसादामुळे टीआरपीतही या कार्यक्रमाने घवघवीत यश मिळवले. पण टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करणारा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात ग्रँड फिनालेला सर्व सदस्य आता परस्परांमधली भांडणे विसरून बहारदार गाण्यांवर एकापेक्षा एक परफॉर्मन्स देणार आहेत.

6 ऑक्टोबरला रविवारी, संध्याकाळी 6 वाजता, 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 6 ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. अशातच आता 'बिग बॉस मराठी'ची सांगता होताच 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या सीझनचा धमाका सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात तालचक्र ढोल ताशा पथकाकडून संबळ वादन

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

Sugar Price: गणेशभक्तांना मोठा दिलासा! साखरेच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

SCROLL FOR NEXT