Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: 100 दिवसांचा बिग बॉस मराठीचा शो आता 70 दिवसांत उरकणार? समोर आली ग्रँड फिनालेची तारीख

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीचा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीजन 5 सध्या चांगलाच गाजताना दिसतो आहे. बिग बॉस मराठीचा शो सुरू झाल्यापासून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. बिग बॉस मराठीच्या या शोने टीआरपीचेही सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. सध्या बिग बॉस मराठीचा ८ वा सीझन सुरू आहे. अशातच चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. बिग बॉस शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा शो लवकर संपणार असण्याची चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या घरातील रंगतदार खेळी सुरू आहे. अशातच १०० दिवसांचा हा शो आता ७० दिवसातच संपणार असल्याने बिग बॉसचे प्रेक्षक नाराज झाले आहेत.

सोशल माडियावर बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये बिग बॉस मराठी या शोचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर होणार आहे असं म्हटलं आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी बिग बॉस हिंदी १८ वे पर्व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. बिग बॉसच्या अधिकृत पेजवरून या शोच्या ग्रँड फिनालेची तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.

बिग बॉस मराठीचा सध्या आठवा सीझन सुरू आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात अरबाज पटेल कॅप्टन बनला आहे. सध्या बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, अभिजीत सांवत, वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, संग्राम हे स्पर्धक खेळ खेळताना दिसत आहे. या कलाकारांपैकी कोण जिंकणार ट्रॉफी?हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT