Suraj Chavan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार', सूरच चव्हाणचा आत्मविश्वास चांगलाच वाढला; पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 5 New Promo: बिग बॉसचा नवा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये सूरज चव्हाण म्हणतो की, 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही. ट्रॉफी मीच जिंकणार.' सूरजचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

'बिग बॉस मराठीचा सीझन ५' सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये टिकटॉक स्टार सूरज चव्हाणचीच हवा आहे. रविवारी 'भाऊचा धक्का'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आलेल्या बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला देखील सूरज चव्हाणने आपल्या गुलीगत स्टाइलच्या माध्यमातून वेड लावलं.

सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचं घर चांगलेच गाजवताना दिसत आहे. अशामध्ये बिग बॉसचा नवा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये सूरज चव्हाण म्हणतो की, 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीला मी कुणाला हात लावू देणार नाही. ट्रॉफी मीच जिंकणार.' सूरज चव्हाणचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सूरज आपल्या हटके डायलॉग आणि स्टाइलच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सूरज भोळा आहे, सूरजला गेम कळत नाही, वाचता येत नाही, समजत नाही असं म्हणणाऱ्यांचा तर त्याने आवाज बंद केला. कारण आतापर्यंत झालेल्या दोन भाऊच्या धक्कामध्ये सूरज चव्हाण हा घरातील पहिला कंटेस्टंट आहे जो सेफ झाला आहे.

पहिला आठवडा सूरज चव्हाण शांत होता. पण आता त्याची चांगलीच चर्चा होत आहे. महाराष्ट्रात सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे जो त्याला चांगलाच पाठिंबा देत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सूरजचे चाहते आणि इतर सेलिब्रिटी त्याला सपोर्ट करण्याचे आवाहन करताना दिसतात.

सध्या सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा खेळ त्याच्या गोलीगत स्टाईलने खेळताना दिसत आहे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंतला सांगतो की, 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी मीच नेणार.' त्यावर अभिजीत त्याला म्हणतो, 'तुझा हक्क आहे.' तर सूरज म्हणतो, 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही.' अभिजीत सूरजला म्हणतो, 'शेवटून पहिला आहेस तू.' त्यावर सूरज म्हणतो, 'शेवटी आलो... शेवटीच जाणार.' यावर अभिजीत म्हणतो, 'तू जिंकलास तर आम्हालाही आनंद होईल.' सध्या सूरजचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! CSMT स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत; मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत|VIDEO

Money Astro Tips: पैसा हातात राहत नाही? तुमच्या या सवयी ठरतील कारणीभूत

Maharashtra Live News Update: सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT