Suraj Cahavan Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan: 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणची सगळीकडं हवा, 'राजा राणी' चित्रपटातून येतोय भेटीला; कधी होणार रिलीज?

Suraj Chavan Raja Rani Movie: छोट्याशा खेडेगावातून आलेला सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लवकरच सूरज त्याच्या आगामी 'राजाराणी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

'बिग बॉस मराठी सीझन ५'ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील टीकटॉक स्टार सूरज चव्हाणने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं असून हा सीझन सूरज चव्हाण चांगलाच गाजवताना दिसत आहे. छोट्याशा खेडेगावातून आलेला सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लवकरच सूरज त्याच्या आगामी 'राजा राणी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरजचा 'राजा राणी' हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सूरज चव्हाणचा आगामी चित्रपट राजा राणीचे काही दिवसांपूर्वीच पोस्टर रिलीज झाले होते. 'राजा राणी'च्या पोस्टरने सर्वांचीच मन जिंकली. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटामध्ये सूरज चव्हाण महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. सूरज या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्याच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. सूरज चव्हाण सोशल मीडियानंतर आता बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. आता 'राजा राणी' चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सूरजच्या आगामी 'राजा राणी' चित्रपटामध्ये रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. रोहनच्या मित्राची महत्वपूर्ण भूमिका सूरज साकारणार आहे. या चित्रपटात रोहन, वैष्णवी, सूरजसोबतच भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजा राणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन आणि निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये असलेल्या सूरजने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. आपल्या मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या माध्यमातून सूरज बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांचे आणि चाहत्यांचे मन जिंकत आहे. इतर दिवशी शांत राहणारा सूरज टास्कमध्ये दमदार कामगिरी करत आहे. 'बिग बॉस'च्या घरात सूरजचा खेळ पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. त्याच्या खेळाचे रितेश देशमुखसह प्रेक्षकही कौतुक करतात. खेळ समजला नसला तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मन जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सूरज बिग बॉसच्या घरात स्वत:ला सिद्ध करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT