Aarya Jadhav And Nikki Tamboli Fighting Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: जान्हवीनंतर आता आर्या आणि निक्कीमध्ये फाइट, पुन्हा कशामुळे झाला वाद?; पाहा व्हिडीओ

Aarya Jadhav And Nikki Tamboli Fighting: बिग बॉस मराठीचा नवा पोमो समोर आला असून यामध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधवमध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसत आहे.

Priya More

बिग बॉस मराठीच्या सीझन ५ ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. पहिल्याच आठवड्यामध्ये या स्पर्धकांमध्ये जोरदार वाद, राडा, भांडणं पाहायला मिळाली. आता बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. या कॅप्टन्सी टास्क दरम्यान जोरदार राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बिग बॉस मराठीचा नवा पोमो समोर आला असून यामध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधवमध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसत आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर दोन ग्रुप झाले. निक्की तांबोळीचा ग्रुप आर्या जाधवला टार्गेट करताना दिसत आहे. बालिश म्हणत आर्याला सतत डिवचले जात आहे. अशामध्ये 'भाऊचा धक्का'मध्ये देखील अनेक स्पर्धकांनी आर्याला बालिशचा टॅग दिला. त्यामुळे आर्या निक्कीच्या ग्रुपवर चांगलीच संतापली आहे. अशामध्ये नुकताच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्की आमने सामने आले. यावेळी निक्कीने आर्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आर्या निक्कीवर संतापते आणि जोरजोरात ओरडू लागते. त्यानंतर आर्या निक्कीला ढकलून देत फालतू म्हणते. दोघींची जोरदार बाचाबाची झाली.

बिग बॉसच्या घरामध्ये आधी जान्हवी आणि आर्यामध्ये जोरदार भांडण झाले होते. दोघींनी एकमेकांवर हात उचलला होता. त्यानंतर भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुखने दोघांना चांगलाच ओरडा दिला होता. त्यानंतर दोघींनाही इथून पुढे घरामध्ये असं न वागण्याचा सल्ला देत शांत राहण्यास सांगण्यात आले. आता निक्की आणि आर्यामध्ये वाद झाला आहे. त्यामुळे या आठवड्याच्या भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुख या दोघींना काय बोलतोय हे पाहणं महत्वाचे राहिल. बिग बॉसच्या घरामध्ये अभिजीत सावंत आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये कॅप्टन्सी टास्क रंगला आहे. आता कोण बिग बॉस मराठी ५ चा पहिला कॅप्टन होतोय हे आजच्या एपिसोडमध्ये कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT