Bigg Boss Marathi Episode Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: राखी सावंत-तेजस्विनी लोणारीमध्ये वादाची ठिणगी, 'बिग बॉसच्या घरामध्ये नव्या पर्वाला सुरूवात

रहिवासी संघ बोर्डवर पहिल्या नंबरची १ नंबरवर कोणाच्या नावाची पाटी लागणार? बिग बॉसच्या घरामधील नवा वाद.

Pooja Dange

Bigg Boss Marathi Episode Update: राखी सावंत हे खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. राखी कधी काय बोलेल याचा नेम नाही. ती तिच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि फटकळ बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. आता राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसणार आहे. आता तिच्या या वागण्याने ती तिकडे काय धमाके करणार हे बिग बॉसलाच माहित. घरात येताच राखी आणि तेजस्विनीमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

राखी सावंत आणि अजून तीन सदस्य घरामध्ये आज प्रवेश करणार आहेत. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉसच्या मागील भागातील हे सदस्य घरातील इतर सदस्यांशी नाडताना दिसणार आहेत. घरात येताच राखी वादाला सुरूवात केली आहे. रहिवासी संघ बोर्डवर पहिल्या नंबरची १ नंबरवर कोणाच्या नावाची पाटी लागणार ? यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला.

राखीने घरात येताच तिच्या नावाची पाटी एक नंबरवर लावली. जिथे आधी तेजस्विनीच्या नावाची पाटी होती. त्यावर तेजस्वनी आणि राखीमध्ये वादाला सुरूवात होते. तेजस्विनी राखीला म्हणते, राखी मॅडम माझी पती आहे ती... यावर राखी म्हणाली, बरोबर आहे ते... तर तेजस्विनी म्हणते, मी माझी पती एक नंबरवर लावणार ... यावर राखी म्हणते, मी आता माझ्या नावाची पाटी लावली आहे... तेजस्विनी म्हणते, असं थोडी आहे माझी पाटी आधी होती. राखी तेजस्विनीला बोलते, मग मी तुझी पाटी तोडणार. यावर तेजस्वीणी राखीला म्हणते मी सुद्धा तुमची पाटी तोडणार. यावर राखी म्हणाली, तो. आता तुझा एक हात तुटला आहे. दुसरा तुटेल. (Rakhi Sawant)

राखी सावंतच्या येण्याने 'बिग बॉसच्या घरामध्ये नवीन वादळ येणार आहे. अपूर्वा आणि तेजस्विनी राखीला टक्कर देणार की राखी या दोघींच्या वरचढ ठरणार हे आपल्याला येत भागात पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आलेले हे चार वाईल्ड कार्ड सदस्य घरात तुफान राडा करणार हे नक्की. (Bigg Boss Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तारीख ठरली! 'Bigg Boss 19'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होणार, टॉप 5 फायनलिस्ट कोण?

Sambhajinagar : ऑनलाईन साखरपुडा! लंडन ते वैजापूर 1 'व्हिडिओ कॉल'वर जुळले दोन जीव! | VIDEO

Maharashtra Live News Update: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

SBI Recruitment: तयारीला लागा! स्टेट बँकेत ३५०० पदांसाठी भरती निघणार; समोर आली मोठी अपडेट

Election : २ आमदारासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, बिहारमध्ये वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT