New Bigg Boss Logo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: अमृता धोंगडे आणि यशश्री मसुरकर यांच्यात जुंपला वाद

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात स्पर्धकांमध्ये जुंपली, स्पर्धा जिंकण्यासाठी होतेय रस्सीखेच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss) दुसरा आठवडा सुरू झाला आहे. सीझनची सुरूवातच वादाने झाली. स्पर्धक जसे एकमेकांना समजून घेत आहेत तसे त्याच्यातील वाद वाढतच आहेत. 'बिग बॉस'च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाला १०० दिवसाच्या स्वतःला सिद्ध करायचे आहे. जे स्पर्धक इतके दिवस शांत होते त्यांचाही आवाज वाढताना दिसत आहे.

'बिग बॉस'च्या घरात रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो. कधी डान्स होतो तर कधी डान्स वर चान्स मारला जातो. स्पर्धकांच्या आनंदासाठी गरबाही होतो. कधी हिरो एन्ट्री घेतो तर कधी सुपरहिरो. या आठवड्यात समृद्धी कॅप्टन आहे. तिच्या कॅप्टन्सी खाली घरामध्ये सर्व कार्य चालू आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये अमृता धोंगडे आणि यशश्री मसुरकर यांच्यात वाद जुंपला आहे. त्या दोघी एकमेकींवर आरोप करत आहेत. त्यांच्या वादात तेजस्वीनी लोणारी मध्यस्थी करत आहे. यावर या दोघी थांबत नाहीत. त्या त्यांचे भांडण कॅप्टनकडे घेऊन जातात.

कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या इंस्टग्रामवर प्रोमो शेअर केला आहे. त्याला त्यांनी 'चाय पे चर्चा' म्हणतं इथे चहाचं मुद्दा बनला, असे कॅप्शन पोस्टला दिले आहे. सकाळच्या चहावरून सुरू झालेली चर्चा थेट भांडणाचा मुद्दाच बनला आहे. त्यामुळे या दोघींचा वाद घरात कोणते वादळ घेऊन येणार याची उत्सुकता स्पर्धांबरोबरच प्रेक्षकांनाहीआहे.

अमृता धोंगडे आणि यशश्री मसुरकर यांचे भांडण कुठले टोक गाठणार हे आजच्या भागात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचे घर म्हणजे वाद-विवाद आणि प्रेम यांचा पेटारा आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक कोणता पत्ता उडणार हे आपल्याला येणाऱ्या भागात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात दाखल

Hair Growth Tips: खरंच, तेल लावल्याने केस वाढतात का? जाणून घ्या

Badlapur : बदलापूरमध्ये महिलांच्या अंडाशयांची तस्करी, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; ३ महिलांना अटक

Palghar Tourism : पालघर लोकल पकडा अन् 'या' ऐतिहासिक ठिकाणी जा, किल्ल्यावरून दिसतो अथांग समुद्र

Health Care: माचा टी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT