Bigg Boss Marathi 5 Latest Episode  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या आठवड्यात चौघांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi 5 Nominate 4 Contestant : गेल्या आठवड्यामध्ये एकाही स्पर्धकाला एलिमिनेट केले नव्हते. आता या आठवड्यात कोणकोणते स्पर्धक नॉमिनेट होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. १५ दिवसांपासून हा शो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करीत आहे. गेल्या रविवारी झालेल्या 'भाऊचा धक्का'वर रितेशने प्रेक्षकांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या आठवड्यामध्ये एकाही स्पर्धकाला एलिमिनेट केले नव्हते. आता या आठवड्यात कोणकोणते स्पर्धक नॉमिनेट होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

'या' आठवड्यात 'हे' सदस्य झालेत नॉमिनेट

घरातील सर्वच सदस्य स्वत:ची प्रगती करत पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भागातदेखील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या आठड्यात चार सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भागात अरबाजने निक्कीला सेव्ह केलं. अभिजीतने पॅडीला सेव्ह केलं. या नॉमिनेशन कार्यात टीम A विजयी झाली. कालच्या भागात वैभवने घन:श्यामला सेफ करुन अभिजीतला नॉमिनेट केल्याचं निक्की, अरबाज आणि जान्हवीला पटलेलं नाही. 'बिग बॉस मराठी' च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की वैभवला म्हणत आहे,"तू खूप चुकीचा निर्णय घेत आहेस. तू आर्यासोबत भांडतोस..तुला तिला नॉमिनेट करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती". पुढे निक्की वैभवला म्हणते,"वैभवला नाही जमत गेम खेळायला".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

SCROLL FOR NEXT