Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: शिव ठाकरेची बिग बॉसमध्ये एन्ट्री; 'तो' नवीन प्रोमो होतोय व्हायरल

Bigg Boss Marathi Shiv Thakare Entry: बिग बॉसच्या घरात अभिनेता शिव ठाकरेची एन्ट्री होणार आहे. बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे स्पर्धकांना भेटायला येणार आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा सीझन 5 सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात मनोरंजनविश्वातील सेलिब्रिटींनी खास उपस्थिती दर्शवली. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. बिग बॉसच्या घरात अभिनेता शिव ठाकरेची एन्ट्री होणार आहे. बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे स्पर्धकांना भेटायला येणार आहे.

बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा फारच रंजक असणार आहे. बिग बॉसच्या घरात आता सात स्पर्धक बाकी आहेत. अशातच स्पर्धकांना भेटायला आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घरात बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता शिव ठाकरेची एंट्री होणार आहे. नुकताच रिलीज करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये,

शिव ठाकरेची हटके एन्ट्री होताना दिसतेय दरम्यान तो म्हणतो, “हे सेलिब्रेशन इतकं भव्य दिव्य राहणार आहे की बिग बॉसच्या इतिहासात कधीच झालेलं नाही. तुम्हा सर्वांना महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा”.शिव ठाकरेच्या आधी घरात अभिनेत्री राखी सावंत, अभिजीत सावंत आणि अनिल थत्ते यांनीही एंट्री घेतली होती. आता शिव ठाकरे नेमकं बिग बॉसच्या घरात काय हंगामा करणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिव ठाकरेच्या एन्ट्रीने बिग बॉसच्या घरात एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळत आहे. शिवने घरात येताच सगळ्या सदस्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. शिव ठाकरे घरात आल्यानंतर या सीझनमधील आतापर्यंतच्या प्रवासाचं सर्वात हटके सेलिब्रेशन होणार असल्याचं म्हटलं आहे. घरातील सगळ्या सदस्यांसाठी शिव एक खास सरप्राईज घेऊन येणार आहे.

बिग बॉस मराठी सीझन 5 सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉसचा मराठी सीझन 5 ग्रँड फिनाले पार पडणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार हे आठही सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांमध्ये कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT