Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: सूरज आणि पॅडीची जोडी पडणार का भारी? महाचक्रव्यूह टास्कमध्ये नेमकं काय घडलं, Video पाहा

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या महाचक्रव्यूह टास्कमध्ये पॅडी दादा आणि सूरजची एक जोडी आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'च्या घरात दररोज नव-नवे टास्क पार पडताना दिसत आहे. प्रत्येक दिवशी काय नवीन घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज टास्कचा महाबाप येणार असल्याचे बोलले जात असून याचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. जिंकण्यासाठी सदस्यांना महाचक्रव्युह पार करावे लागणार आहे.

नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये, पॅडी दादा आणि सूरजची एक जोडी आहे. पॅडी दादा आणि सूरज हे महाटास्क खेळताना दिसत आहेत. या महाचक्रव्युहात सूरज डोळ्याला पट्टी बांधून पॅडी दादाने सांगितलेल्या सूचना ऐकून गेम खेळताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात आता या महाचक्रव्युहात कोणती जोडी धमाका करणार? आणि कोण टास्क गाजवणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आजच्या भागात हा टास्क पाहताना नक्कीच प्रेक्षकांना मज्जा येणार आहे.

येत्या 6 ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बिग बॉस मराठी सीझन ५ हा १०० दिवसांचा शो आता ७० दिवसांतच संपणार आहे. बिग बॉसच्या घरात आता सहा स्पर्धक आहेत. यापैंकी कोण नेमकं बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT