Sai Lokur Baby Naming Ceremony Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Lokur Baby Naming Ceremony: नव्याने आई वडील... 'बिग बॉस' फेम सई लोकूरच्या लेकीचे बारसं; फोटो केले शेअर

Sai Lokur Share Photo: 'बिग बॉस' मराठीमधून अभिनेत्री सई लोकूर घरघरात पोहचली. सईने १७ डिसेंबरला एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे. सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sai Lokur Share photo Of Her Baby Naming Ceremony:

'बिग बॉस' मराठीमधून अभिनेत्री सई लोकूर घरघरात पोहचली. सई लोकूर नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सईने १७ डिसेंबरला एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे. सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर नुकताच सईच्या लेकीचा बारसा सोहळा पार पडला आहे. (Entertainment News In Marathi)

सई लोकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या दैनंदिन घटना सोशल मीडियावरुन शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने आई होणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिने बेबीबंपचे छान फोटोशूट केले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिने लेकीच्या बारसा सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सईने घरच्या घरी लेकीचं बारसं केलं आहे. अगदी साध्या पद्धतीने तिने लेकीचे बारसे केलं आहे. यावेळी सईने घराला छान सजवल्याचे दिसत आहे. लेकीच्या पाळण्याभोवती फुलांची सजावट केल्याचे दिसत आहे. सई आणि तिच्या नवऱ्याने लेकीच्या बारसा सोहळ्याला व्हाईट कलरचे कपडे परिधान केले आहेत. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 'नव्याने पालक झालो त्याचा आनंद आणि अभिमान', असं कॅप्शन सईने या फोटोला दिले आहे.

सईच्या या फोटोवर लाई्क्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीतील कलाकारांनी आणि चाहत्यांनी सईचे अभिनंदन केले आहे. चाहत्यांनी सईचे बाळचे नाव काय असा प्रश्न विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT