Abhijeet Sawant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Abhijeet Sawant Look: सोशल मीडियावर अभिजीतचा नवीन लूक पाहून नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा आठवा आठवडा फारच रंजक आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीचा टास्क पार पडला आहे. दोन्ही टीममध्ये कॅप्टन्सी पदासांठी स्पर्धकांची दमदार खेळी पाहायला मिळाली. अशातच आता अभिजीत सावंतचा हटके व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर अभिजीत सांवतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिता अभिजीतचा मेकअप करताना दिसत आहे. तर जान्हवी अभिजीतला साडी नेसवताना दिसत आहे. याचदरम्यान अरबाज अभिजीतला बघून ओ छम्मक छल्लो असे म्हणतो आहे. अशातच निक्की देखील पुढे येते आणि म्हणते , बाईssss...पुढे अरबाज आणि निक्की दोघेही अभिजीतकडे बघून हसतात.

यानंतर निक्की अभिजीतला खोटे केस लावताना दिसत आहे. तेव्हा अभिजीत म्हणतो, हे काय दिवस आले. पोरं म्हणतील, हे बापाचं काय झालंय? मग सर्व हसतात. तितक्यात अरबाज म्हणतो, “सूरजसाठी एक मुलगी पाहिजे होती आणि तुम्ही खरंच आणलात.” सूरज म्हणतो, “गप्प…पण कसली दिसतेस गं”. असं अभिजीकडे बघून सूरज म्हणतो. त्यानंतर पदर नीट करून अभिजीत साडीत चालताना पाहायला मिळत आहे. अभिजीतचा हा भन्नाट लूक पाहून नेटकऱ्यांनी देखील हसायला येतं आहे. सोशल मीडियावर अभिजीतचा हा हटके व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT