Marathi compulsory Saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi compulsory: 'मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षाचालकांवर संतापला बिग बॉस फेम अभिनेता; म्हणाला, 'इथं राहायचं असेल तर...'

Marathi compulsory: बिग बॉस मराठी ६ फेम विशाल कोटियनने मराठी सक्तीच्या निर्णयाला समर्थन देत रिक्षा-टॅक्सी संपावर संताप व्यक्त केला. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येणं आवश्यक असल्याचं त्याने स्पष्ट सांगितलं आहे.

Shruti Vilas Kadam

Vishal Kotiyan: ‘बिग बॉस मराठी ६’मधून लोकप्रिय झालेला अभिनेता विशाल कोटियन सध्या त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादात त्याने ठाम भूमिका मांडली आहे. राज्य सरकारने १ मेपासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी येणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात काही संघटनांनी ४ मेपासून संपाची हाक दिली असून, यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आता विशालने देखील एक ठाम मत व्यक्त केले आहे.

बिग बॉसच्या घरातून टॉप ३ बनून बाहेर आल्यानंतर विशाल कोटियनने  नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत या मुद्द्यावर आपलं मत स्पष्ट केलं. तो म्हणाला की, “मी जन्माने कर्माने आणि मनानेही मराठी आहे. या आधी मी काही मराठी नाटकांमध्ये काम केलंय. मध्ये कुठेतरी हिंदीत काम करत असताना मराठी बोलायची सवय सुटली होती. पण आता बिग बॉसमुळे मला स्पष्ट मराठी बोलता येतंय. मराठी एक चांगली भाषा आहे. मला मराठी आणि महाराष्ट्राबद्दल खूप आदर आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे याच मताचा मी आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये ही असंच आहे. महाराष्ट्रात राहूनही तुम्हाला मराठी येत नसेल तर शिका. इथे राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल. मी आता बिग बॉस मधून बाहेर आलोय त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण, हा निर्णय योग्य आहे . मराठी यायलाच पाहिजे. मराठी बोला कारण हा महाराष्ट्र आहे.

दरम्यान, या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींनी विशालच्या भूमिकेला समर्थन दिलं, तर काहींनी या निर्णयामुळे बाहेरून आलेल्या चालकांना अडचणी येऊ शकतात, असं मत व्यक्त केलं.

मराठी भाषा सक्तीचा हा मुद्दा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून, विशाल कोटियनसह अभिनेता - दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेत्री सुषमा जयवंत, ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पोवार, अभिनेता अंशुमन विचारे, अक्षय केळकर, गायक उत्कर्ष शिंदे, अंकिता वालावलकर, तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?

Agriculture Scam: कृषी साहित्यात कोट्यवधींचा घोटाळा, शेतकऱ्यांच्या निधीवर अधिकाऱ्यांचा डल्ला; 21 कोटी लाटणाऱ्या 15 अधिकाऱ्यांचं निलंबन

काका मला वाचवा, अचानक शिंदे मोदींच्या भेटीला, शिवसेनेचा वाद मोदींच्या कोर्टात?

मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 'वनरंग २०२६' चे उद्घाटन, ३ दिवस सुरू राहणार उत्सव

NCPला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला? प्रशांत किशोर NCPचे नवे सल्लागार?

SCROLL FOR NEXT