Bigg Boss Marathi 6 Video saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Video : विशालसोबत ब्रेकअप; राखीशी बोलताना रुचिता चक्कर येऊन पडली, बिग बॉसच्या घरात नेमकं चाललंय तरी काय?

Vishal Kotian-Ruchita Jamdar Breakup : बिग बॉसच्या घरातील कपल रुचिता आणि विशाल यांच्या नात्यात दुरावा आला आहे. ज्यामुळे रुचिताला राखीसोबत बोलताना तिला चक्कर येते.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात तीन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे.

घरात सुरुवातीपासून रुचिता- विशाल ही जोडी पाहायला मिळत आहे.

रुचिता आणि विशालच्या नात्यात दुरावा आला.

'बिग बॉस मराठी 6'च्या घरात रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत असतो. घरातील सदस्यांची नाती पटकन बदलताना दिसतात. दोन - दोन दिवसांनी यांचे ग्रुप देखील बदलतात. बिग बॉस मध्ये सुरूवातीपासून चर्चेत असलेली जोडी म्हणजे रुचिता आणि विशाल होय. अलिकडेच रुचिता आणि विशालने आपल्या नात्याची कबुली दिली. दोघेही एकमेकांना आवडतात. त्यामुळे बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसत होते. मात्र आता या जोडीत मोठी फूट पडली आहे.

बिग बॉसचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात असे दिसून येते की, रुचिता- विशालच्या जोडीत दुरावा आला आहे. त्याचा ब्रेक झाल्याचे दिसून येत आहे. नेमकं बिग बॉसच्या घरात चाललंय तरी काय? हा मोठा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. नवीन प्रोमोवर प्रेक्षक भरभरून कमेंट्स करत आहे. नेटकरी दोघांनाही नावे ठेवताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

(रुचिता आणि विशाल बाल्कनीमध्ये बसून बोलत असतात. )

रुचिता - तू मला आवडतो तर आवडतो...

विशाल - ते असे वाटतेय की, मी तुझ्या पाठी पाठी जबरदस्ती करतोय...

रुचिता - विशाल तुला कळतेय का, माझी ती रिएक्शन होती...

विशाल - मला नाही बोलायचे तुझ्याशी...मी तुझ्याशी बोलो ही सर्वात मोठी चुकी आहे...

(त्यानंतर रुचिता तेथून निघून जाते. त्यानंतर ती खूप रडते. तेव्हा सागर तिल आधार देताना दिसतो. त्यानंतर घरात राखी सावंत तिच्याशी बोलते. रुचिताला समजावते. तिला आधार देते. )

राखी सावंत - दुःख करून घेऊ नकोस. (एवढ्याच रुचिता जमिनीवर कोसळते) विशाल ती पडली...

बिग बॉसच्या घरात आता नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. नॉमिनेशन टास्क दरम्यान नवा वाद होताना दिसतो. राखी सावंत तन्वी कोलते आणि दिपालीला नॉमिनेट करते. ती लोक घरात फेक वागत असल्याचे राखी सांगते. आता येणाऱ्या भागांमध्ये विशाल-रुचिताचा नात्याचे नेमकं काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes complications: या 6 अवयवांवर मधुमेहाचा होतो गंभीर परिणाम, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता; राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडणार?

केस गळणं म्हणजे कॅन्सरचं लक्षणं? घाबरण्यापूर्वी ही माहिती वाचा

Sunil Grover: फुटपाथवर झोपलेला दिसला प्रसिद्ध अभिनेता; व्हिडिओ पाहून चाहते हैरान, म्हणाले, 'अहंकार नसल्यावर...'

SCROLL FOR NEXT